अर्थ मंत्रालयाचा मोठा निर्णय! राज्यांना पाठवले 1,39,750 कोटी

केंद्रात पुन्हा एकदा सत्तेत आलेल्या मोदी सरकारच्या अर्थमंत्रालयाने(financial planner), तिसऱ्या कार्यकाळातील कामकाजाच्या पहिल्याच दिवशी मोठा निर्णय घेतला. तत्पुर्वी पंतप्रधान मोदींच्या मंत्र्यांचे खाते वाटप जाहीर झाले, ज्यामध्ये मोदींनी अर्थ खात्याची जबाबादारी पुन्हा एकदा निर्मला सीतारामन यांनाच सोपवली आहे.

तर निर्मला सीतारामन (financial planner)यांच्या अर्थखात्याने जून 2024 महिन्यासाठी देणगी रक्कमेच्या व्यतिरिक्त राज्यांना कर हस्तातरणांचा एख अतिरिक्त हप्ता जारी करण्याचा निर्णय घेतला आहे. चालू महिन्यात दोन्ही मिळून 1,39,750 कोटी रुपये जारी करण्यात आले आहेत. यामुळे राज्य सरकरे विकास आणि निधी गुंतवणुकीत गती आणण्यात सक्षम होतील.

अंतरिम अर्थसंकल्प 2024-25 मध्ये राज्यांना कर हस्तांतरणासाठी 12,19,783 कोटी रुपयांची तरतूद होती. या रिलीजसह 10 जून, 2024 पर्यंत राज्यांना हस्तांतरित एकूण रक्कम आर्थिक वर्ष 2024-25 साठी 2,79,500 कोटी रुपये आहे.

वाटपाच्या समोर आलेल्या माहितीनुसार उत्तर प्रदेशला सर्वाधिक 25069.88 कोटी रुपये मिळाले आहेत. तर 14056.12 कोटी रुपयासंह दुसऱ्या स्थानावर बिहार आहे. तर तिसऱ्या स्थावर 10970.44 कोटी रुपयांसह मध्य प्रदेश आहे.

महाराष्ट्राचा क्रमांक या यादीत 8828.08 कोटी रुपयांसह 14 व्या स्थानावर असून , सर्वात शेवटचा म्हणजे 28 व्या क्रमांकांवर 10513.46 कोटींसह पश्चिम बंगालचा आहे.

हेही वाचा :

सोन्याच्या तस्करीप्रकरणी दोन परदेशी महिलांना अटक.

लग्नाच्या पाच वर्षांनी आणखी एका प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्याचा संसार मोडला.

भुजबळांचे हे फोटो तुम्ही कधीच पाहिले नसतील ब्लेझर, चष्मा अन् दाढी..