MPSC विद्यार्थ्यांसाठी मोठी खुशखबर; संयुक्त परीक्षेबाबत महाराष्ट्र सरकारने घेतला ‘हा’ मोठा निर्णय
पुणे: महाराष्ट्र(maharashtra) लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) घेतल्या जाणाऱ्या स्पर्धा परीक्षांसाठी एक वेळची विशेष बाब म्हणून शासन सेवेतील प्रवेशासाठी विहित कमाल वयोमर्यादेत एक वर्ष इतकी शिथिलता देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. या अनुषंगाने महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा आणि महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा या परीक्षांसाठी वयाधिक झालेल्या पात्र उमेदवारांना अर्ज भरण्याची संधी देण्यात आली असून, उमेदवारांना ६ जानेवारीपर्यंत अर्ज भरता येणार आहे.
एमपीएससीने प्रसिद्धिपत्रकाद्वारे ही माहिती दिली. महाराष्ट्र(maharashtra) राज्यातील सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्गाकरीता आरक्षण अधिनियमाअंतर्गत राज्यातील सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्गासाठी राज्य शासकीय सेवेतील पदांवर नियुक्तीसाठी आरक्षणाची तरतूद करण्यात आली आहे.
या अधिसूचनेतील तरतुदीच्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने शासनामार्फत पदसंख्या आणि आरक्षण नमूद करून सुधारित मागणीपत्रे एमपीएससीला देण्यात आली होती. त्यानुसार एमपीएससीने जाहिराती प्रसिद्ध केल्या होत्या. मात्र, एक वेळची विशेष बाब म्हणून वयाधिक उमेदवारांना संधी देण्याचा निर्णय २० डिसेंबर रोजी घेण्यात आला.
या निर्णयाच्या अनुषंगाने एमपीएससीने प्रसिद्ध केलेल्या महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ आणि महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ या संवर्गाच्या जाहिरातींस अनुसरुन निश्चित केलेल्या कमाल वयोमर्यादेमध्ये एक वर्षांची शिथिलता देण्यात आली आहे. तसेच पात्र उमेदवारांना अर्ज सादर करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
राज्य शासनाच्या सेवेत जाण्यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने आगामी प्रमुख परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले असून, वर्षभर परीक्षाच-परीक्षा राहणार आहे. त्यामुळे गुणवान, मेहनती व महत्त्वाकांक्षी उमेदवार तयारीला लागणार आहे.
नव्या वर्षांत 5 जानेवारी रोजी महाराष्ट्र गट-ब अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्वपरीक्षा होणार आहे. यामध्ये सहायक कक्ष अधिकारी, राज्य कर निरीक्षक, पोलिस उपनिरीक्षक, दुय्यम निबंधक श्रेणी-1, मुद्रांक निरीक्षक या पदांचा समावेश आहे. महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्वपरीक्षा 2 फेब्रुवारी 2025 रोजी होणार आहे. उद्योग निरीक्षक, दुय्यम निरीक्षक, तांत्रिक सहायक, कर सहायक, बेलिफ व लिपीक टंकलेखक, सहायक मोटार वाहन निरीक्षक या पदांचा यामध्ये समावेश आहे.
दरम्यान, 16 मार्च रोजी दिवाणी न्यायाधीश व कनिष्ठस्तर न्यायदंडाधिकारी या पदासाठीची पूर्वपरीक्षा आहे. महाराष्ट्र नागरी सेवा पूर्व परीक्षा नुकतीच झाली असून, 26 एप्रिल रोजी 35 संवर्गातील मुख्य परीक्षा होणार आहे.
एमपीएससी विद्यार्थ्यांसोबत आपले महायुती सरकार!
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) December 23, 2024
कमाल वयोमर्यादेत शिथिलता देण्याबाबत शासन निर्णय…
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या राज्य शासकीय सेवेतील विविध पदांच्या भरतीसाठीच्या कमाल वयोमार्यदेत शिथिलता देण्याचा निर्णय घेतला. यामुळे आता महाराष्ट्र गट-ब सेवा संयुक्त परीक्षा तसेच… pic.twitter.com/1k4f153F0i
महाराष्ट्र वन सेवा मुख्य परीक्षा 10 मे, 2025, महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी मुख्य परीक्षा 18 मे, 2025, महाराष्ट्र कृषी सेवा मुख्य परीक्षा 18 मे, 2025 समावेश आहे. तसेच दिनांक स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येणार असलेल्या परीक्षामध्ये महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित पूर्व परीक्षा, राज्यसेवा मुख्य परीक्षा, महाराष्ट्र यांत्रिकी अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा, विद्युत अभियांत्रिकी मुख्य परीक्षा, स्थापत्य अभियांत्रिकी मुख्य परीक्षा आदींचा समावेश आहे.
हेही वाचा :
रोहित शर्माच्या दुखापतीबाबत आली मोठी अपडेट!
स्वयंपाक सुरू असतानाच गॅस सिलिंडरचा स्फोट; घर जळून खाक
मंत्रिमंडळविस्तार, खातेवाटपानंतर आता ‘या’ मुद्द्यावरून शिंदे गटाच्या नेत्यामंध्ये नाराजी