मोठी बातमी! बड्या नेत्याच्या कारमधून 5 कोटींचं घबाड जप्त
राज्यात विधानसभा (politics)निवडणुकांमुळे आचारसंहिता लागू झाली आहे. अशात पुण्यात भोरजवळ बड्या नेत्याशी संबंधित असलेल्या कारमध्ये मोठं घबाड सापडलं आहे. यामुळे पुण्यात एकच खळबळ उडाली आहे. राजगड पोलीस स्टेशनच्या हद्दीत नाकाबंदीच्या वेळेस एका गाडीत 5 कोटींची रोकड आढळून आली आहे. याबाबत इन्कम टॅक्स व संबंधित विभागांना माहिती देण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पुणे ग्रामीण पोलिसांनी खेड-शिवापूर टोलनाक्यावर(politics) नाकाबंदी दरम्यान ही घबाड जप्त केली आहे. इनोव्हा क्रिस्टा या कारमध्ये ही रोकड आढळली. ही कार सांगोल्याची असून ती नलवडे नामक व्यक्तीच्या नावावर आहे. निवडणूक आयोगाचे अधिकारी देखील माहिती मिळताच या ठिकाणी दाखल झाले.
या प्रकरणी आता राजकीय वर्तुळात एकच चर्चा रंगली आहे. ठाकरे गटाकडून तर हे घबाड कुणाचं आहे, याबाबतही दावा करण्यात आला आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी यासंदर्भात खळबळजनक ट्वीट केलं आहे. त्यांनी थेट या नेत्याचं नावच जाहीर केलं आहे.
मिंधे टोळीतील एका आमदाराच्या गाडीत खेड शिवापूर टोल नाक्यावर 15 कोटी सापडले! हे आमदार कोण? काय झाडी…काय डोंगर…मिंधे यांनी निवडणुकीसाठी प्रत्येक उमेदवारास 75 कोटी पाठवले. 15कोटी चा हा पहिला हप्ता!काय बापू..किती हे खोके? असा सवालही संजय राऊत यांनी केलाय.
हेही वाचा :
१५ मिनिटांमध्ये सकाळच्या नाश्त्यासाठी बनवा व्हेजिटेबल उपमा
दिल्ली कॅपिटल्स ऋषभ पंतला सोडणार? इन्स्टा स्टोरीने चाहत्यांमध्ये निर्माण केली उत्सुकता!
सलमान खानला 5 कोटींची खंडणी मागणाऱ्या व्यक्तीची माफी; “चूक झाली, माफ करा” अशी विनंती