मोठी बातमी! प्रसिद्ध गायकाचा अपघात…

संगीतकार आणि गायक विशाल ददलानीचा अपघात(accident) झाला आहे. जखमी झाल्यामुळे त्याला त्याची कॉन्सर्ट पुढे ढकलावी लागली. विशालने स्वतः याविषयी माहिती दिली असून, सोशल मीडिया पोस्टद्वारे चाहत्यांची माफीही मागितली आहे. यानंतर विशालचे चाहते काळजीत पडले असून, त्याच्या सुरक्षिततेसाठी प्रार्थना करत आहेत.

विशालचा अपघात(accident) कधी आणि कसा झाला, याविषयी माहिती समोर आलेली नाही, पण त्याने शेअर केलेल्या पोस्टनुसार त्याच्यावर उपचार सुरू आहेत. विशालने इन्स्टाग्राम पोस्टमधून या अपघाताची माहिती दिली. त्याने ही कॉन्सर्ट पुढे ढकलण्यात आल्याची पोस्ट त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये शेअर केली आहे.

ज्यावर त्याने लिहिले की, ‘माझे दुर्दैव. माझा एक छोटासा अपघात झाला. मी लवकरच बरा होईन आणि परत येईन. मी तुम्हाला माझ्याबद्दलची प्रत्येक अपडेट देत राहीन. लवकरच पुण्यात भेटू.’

कॉन्सर्टच्या आयोजकांची पोस्ट ‘जस्ट अर्बन’ या इन्स्टाग्राम हँडलवरून शेअर करण्यात आली आहे. यामध्ये त्यांनी विशाल-शेखरची म्युझिक कॉन्सर्ट रद्द झाल्याबद्दल खेद व्यक्त केला. तिकिटांचे पैसे परत केले जातील, असेही सांगण्यात आले.

पोस्टमध्ये लिहिले होते, ‘विशाल आणि शेखरची म्युझिक कॉन्सर्ट पुढे ढकलण्यात आली आहे. तुम्हाला कळवण्यास दुःख होत आहे की विशाल-शेखरचा २ मार्च २०२५ रोजी होणारा बहुप्रतिक्षित अर्बन शो म्युझिक कॉन्सर्ट पुढे ढकलण्यात आला आहे. विशाल ददलानी यांच्यासोबत झालेल्या दुर्दैवी अपघातामुळे हा निर्णय घेण्यात आला. त्याच्यावर सध्या उपचार सुरू आहेत.’

हेही वाचा :

स्वयंपाकघरात ठेवलेल्या या 6 गोष्टी वेळोवेळी बदला नाहीतर होतील वाईट परिणाम

स्वप्नात या गोष्टी पाहून बलाढ्य रावणही घाबरला जाणून घ्या काय आहे स्वप्नांचा अर्थ

अचानक फोन फुटला आणि महिलेच्या पॅंटने पेट घेतला पुढे जे घडलं ते धक्कादायक Video Viral