वाहनधारकांसाठी मोठी बातमी! टोलचं झंझट कायमचं मिटणार

प्रवास करताना सर्वात जास्त डोकेदुखी ठरतो, तो म्हणजे टोलनाका. महामार्गावरील टोल(Toll) हा नियमित प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी मोठी डोकेदुखीच आहे. खरंतर टोलमुळं प्रत्येक प्रवास महागडा वाटतो, अन् तिथे थांबल्यामुळे बराच उशीर देखील होतो. परंतु आता सरकार या दुखण्यावर औषध काढण्याच्या तयारीत आहे. या समस्येवर सरकार उपाय शोधत आहे, लवकरच टोलसंदर्भात नवीन योजना आणण्याची शक्यता आहे.

नियमित प्रवाशांवरील टोलचा(Toll) भार कमी करण्यासाठी सरकार दोन योजना आणण्याच्या तयारीत आहे. यामध्ये वार्षिक आणि आजीवन टोल पासचा समावेश आहे. अनुक्रमे 3 हजार आणि 30 हजार रुपयांना 15 वर्षांसाठी वार्षिक आणि आजीवन टोल पास आणण्याची योजना आखत आहे. या योजनांमुळे प्रवास सुलभ आणि त्रासमुक्त होईल, असं आश्वासन सरकारकडून दिलं जातंय.
रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाकडे हा प्रस्ताव सध्या प्रगतीपथावर आहेत. महामार्ग वापरकर्त्यांना दिलासा देण्यासाठी मंत्रालय प्रति किमी टोल दर कमी करण्याचा विचार करत असल्याचंही अहवालात नमूद करण्यात आलंय.
वार्षिक टोल पास किंवा आजीवन पासचे फायदे मिळविण्यासाठी कोणतेही अतिरिक्त पास खरेदी करण्याची आवश्यकता नाहीये. ते FASTags मध्ये एम्बेड केले जाणार असल्याची माहिती मिळतेय. मासिक पासची किंमत सुमारे 340 रूपये आहे, ती वार्षिक वापरकर्त्यांसाठी 4080 रूपयांपर्यंत जाऊ शकते. रस्ते आणि वाहतूक मंत्रालय अमर्यादित प्रवासासह वार्षिक पास 3 हजार रुपयांमध्ये आणण्याची योजना आखत आहे. हा पर्याय मासिक पासपेक्षा खूपच स्वस्त आहे. त्यामुळे कदाचित या पासला जास्तच पसंती मिळू शकते, असा अंदाज वर्तवला जातोय.
केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी देखील सांगितलंय की, सरकार चारचाकी वाहनधारकांना पास देण्याची योजना आखत आहे. मंत्रालयाचे उद्दिष्ट अनेक समस्यांवर एक-स्टॉप उपाय आणणे, असं आहे. यामध्ये महानगरपालिका हद्दीतील टोल प्लाझांबद्दल वाढणारी नाराजी, 60 किमीपेक्षा कमी अंतरावरील टोल गेट आणि प्लाझावर होणारा हिंसाचार यांचा समावेश आहे.
टोल महसुलात व्यावसायिक वाहनांचा वाटा जास्त आहे. 2023-24 मध्ये एकूण टोल महसूल 55,000 कोटी रुपये होता. त्यात खाजगी कारचा वाटा फक्त 8,000 कोटी रुपये होता. टोल व्यवहार आणि संकलन अहवाल असं दर्शवतात की, 53 टक्के व्यवहार खाजगी कारसाठी होते, परंतु त्यांचा वाटा फक्त 21 टक्के होता. सकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत टोल प्लाझावर 60 टक्के वाहतूक खाजगी वाहनांची असते. व्यावसायिक वाहनांचे वितरण दिवसा आणि रात्री एकसारखे असते.
हेही वाचा :
‘या’ अभिनेत्याने अखेर चाहत्यांना दाखवला मुलाचा चेहरा!
अमित ठाकरे भाजपच्या कोट्यातून राज्यपाल नियुक्त आमदार होण्याची शक्यता
असा बॉयफ्रेंड नको गं बाई! आधी प्रपोज केले अन् नंतर…; Video Viral