मोठी बातमी! मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली

मराठा आरक्षणासाठी संघर्ष करणारे नेते मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आमरण उपोषण सुरू केले आहे. २५ जानेवारीपासून अंतरवाली सराटी येथे सुरू असलेल्या या उपोषणाच्या पाचव्या दिवशी त्यांची प्रकृती(health) खालावली. त्यामुळे मंगळवारी रात्री त्यांना सलाईनद्वारे उपचार घ्यावे लागले. भाजप आमदार सुरेश धस यांनी देखील त्यांना उपचार घेण्याची विनंती केली होती.

मनोज जरांगे यांच्या प्रकृतीत(health)सातत्याने बिघाड होत असल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही त्यांच्या आरोग्याची चिंता व्यक्त केली. तसेच, त्यांनी उपचार घ्यावेत असा संदेश दिला आहे. डॉक्टर धनंजय देशमुख यांनीही त्यांना सलाईन घेण्याचा सल्ला दिला. डॉक्टरांच्या आणि आंदोलकांच्या आग्रहानंतर अखेर मनोज जरांगे यांनी उपचार घेण्यास सहमती दर्शवली.

मंगळवारी भाजप आमदार सुरेश धस यांनी अंतरवाली सराटीत जाऊन मनोज जरांगे यांच्या तब्येतीची विचारपूस केली. त्यांनी मनोज जरांगेंनी सलाईन घ्यावी, असा आग्रह केला. आमदार धस यांनी सांगितले की, मुख्यमंत्री फडणवीस यांनाही मनोज जरांगेंच्या आरोग्याची चिंता आहे आणि त्यांनी उपचार घ्यावेत अशी सूचना केली आहे.

मनोज जरांगे यांच्या आरोग्यावर वैद्यकीय पथकाने लक्ष केंद्रित केले आहे. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रदीप पाटील यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्यावर देखरेख ठेवली जात आहे. त्यांच्या आरोग्यविषयक प्रत्येक हालचालींवर डॉक्टर सतत लक्ष ठेवून आहेत.

हेही वाचा :

धक्कादायक! रोहित शर्माची गावसकरांविरोधात BCCI कडे तक्रार

लीलावतीपासून घर १५ मिनिटांवर, मग २ तास का लागले; सैफ अली खान हल्ला प्रकरणात नवा ट्विस्ट

शनिवारीही खुला राहणार शेअर बाजार, NSE ने जाहीर केले का केला बदल