मोठी बातमी! दिल्ली एअरपोर्टचं छत कोसळलं; अनेक कार चक्काचूर, पाहा Video
राजधानी दिल्लीतून एक मोठी बातमी समोर आली आहे. दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या(airport) टर्मिनल – १ मधील छताचा काही भाग कोसळला आहे. यामध्ये अनेक वाहने छताखाली दबली असून आतापर्यंत एकाचा मृत्यू झाला आहे. तर ४ जण जखमी झाल्याचे वृत्त आहे. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. आज शुक्रवारी पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास ही घटना घडली आहे.
या घटनेमुळे प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण(airport) पसरलं आहे. अंगाचा थरकाप उडवणाऱ्या या घटनेचा व्हिडीओ देखील समोर आला आहे. दरम्यान, छत कोसळण्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे ३ गाड्या घटनास्थळी रवाना झाल्या आहेत. घटनास्थळी बचावकार्य सुरू आहे. या अपघातात अनेक वाहनांचेही नुकसान झाले आहे.
प्रवाशांनी घाबरून जाऊ नये, असं आवाहन पोलिसांनी केले आहे. राजधानी दिल्लीत सध्या मुसळधार पाऊस सुरू आहे. पावसामुळे नद्या-नाले दुथडी भरून वाहत असून जनजीवन विस्कळीत झालं आहे. पावसासोबत वाऱ्याचा जोरही अधिक असल्याने अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली आहेत.
“सकाळी साडेपाचच्या सुमारास आम्हाला कॉलवरुन विमानतळावरील छत कोसळल्याची माहिती देण्यात आली. टर्मिनस 1 वर हा अपघात झाल्याचं सांगण्यात आलं. त्यानंतर अग्निशामनदलाच्या 3 गाड्या तातडीने घटनास्थळी रवाना झाल्या,” अशी माहिती दिल्ली अग्निशामन दलाच्या अधिकाऱ्यांनी एएनआयशी बोलताना दिली.
हा अपघात नेमका कशामुळे झाला याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. मात्र दिल्ली तसेच दिल्ली एनसीआर भागामध्ये गुरुवारी रात्रीपासूनच जोरदार पाऊस पडत आहे. वीजांच्या कडकडाटासहीत मुसळधार पाऊस पडत असल्याने अनेक भागांमध्ये पाणी साचलं आहे. बऱ्याच ठिकाणी रस्ते जलमय झाले असून जनजीवन विस्कळीत झालं आहे. पावसामुळे उष्णतेपासून दिलासा मिळाला असला तरी बाकी मनस्ताप दिल्लीकरांना सहन करावा लागत आहे. दिल्लीत मान्सून पूर्व पावसामुळे सर्वाधिक तापमान 40 अंश सेल्सिअसखालीच राहिलं.
हेही वाचा :
मैत्रीच्या नात्यात ‘हे’ टाळा, नाहीतर नातं होईल दुराव्याला बळी!
फ्रेंच फ्राईज, स्प्रिंग रोलची चव वाढवा, घरीच बनवा पेरी-पेरी मसाला
पोटाचे आरोग्य ठेवण्यासाठी खालील काही सूचना उपयुक्त असू शकतात