बांग्लादेशातील व्हिसा केंद्र अनिश्चित काळासाठी बंद; केंद्र सरकारचा निर्णय

सरकारी नोकऱ्यांमधील आरक्षण व्यवस्थेच्या विरोधात बांगलादेशात(Decision) गेल्या अनेक दिवसांपासून सुरु असणाऱ्या आंदोलनात आतापर्यंत 400 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे तर अनेक जण जखमी झाले आहे. देशात सत्तापलट झाल्यानंतर अल्पसंख्यक हिंदू समाजाला टार्गेट केले जात आहे. उन्मादी जमावाकडून हिंदूंची घरे लुटली जात आहे. आगी लावल्या जात आहेत.

लोकांना बेदम मारहाण(Decision) केली जात आहे. या घटनांवर जगभरातून चिंता व्यक्त केली जात आहे. या घडामोडीवर भारत सरकारची बारकाईने नजर आहे. यातच आता सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. भारताने बांग्लादेशात दूतावासाचे व्हिसा केंद्र अनिश्चित काळासाठी बंद केले आहे.

हेही वाचा:

नदीकाठी करत होता स्टंट; अचानक तोल गेला अन्…Video

Jio सिम बंद झालं म्हणून ग्राहकाने थेट मुकेश अंबानींना खेचलं कोर्टात

प्राजक्ता माळीची चाहत्यांना वाढदिवसाची भेट, ‘फुलवंती’ची रिलीज डेट जाहीर