ग्राहकांना मोठा दिलासा! होम लोन, कार लोन होणार स्वस्त

सर्वसामान्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. (customers)आता होम लोन, कार लोन आणि पर्सनल लोनचा ईएमआय कमी होणार आहे. एचडीएफसी बँकेच्या ग्राहकांसाठी खुशखबर आहे. एचडीएफसी बँकेने MCLR मध्ये कपात केली आहे. बँकेने MCLR म ०.१० टक्क्यांनी कपात केली आहे. याचा थेट परिणाम हा लोनवर होणार आहे. रिझर्व्ह बँकेच्या बैठकीपूर्वीच एचडीएफसी बँकेने हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.रिझर्व्ह बँकेने २०२५ च्या सुरुवातीलाच रेपो रेट कमी केला आहे. यामुळे कर्जाचा हप्ता कमी झाला आहे. यानंतर आता एप्रिल महिन्यात रिझर्व्ह बँकेची पुन्हा बैठक होणार आहे. यामध्ये रेपो रेट आणखी कमी होण्याची शक्यता आहे.

MCLR म्हणजे मार्जिनल कॉस्ट ऑफ फंड्स बेस्ड लेंडिंग रेट. एमसीएलआर हे कर्जावरील व्याजदर निश्चित करण्यासाठी मदत करते. जर एमसीएलआर रेटमध्ये कपात झाली तर (customers) कर्जावरील व्याजदरातदखील कपात होईल. एचडीएफसी बँकेने हे नवीन एमसीएलआर रेट आजपासून लागू केले आहे. त्यामुळे जर तुम्ही घर खरेदी करायचा विचार करत असाल तर होम लोनवरील व्याजदर कमी होणार आहे.

एमसीएलआर रेट हे एका महिन्यासाठी एमसीएलआर ९.२० टक्के होते. त्यात ०.१० टक्क्यांनी कपात झाली आहे. म्हणजेच आता एमसीएलआर ९.१० टक्के असणार आहे.तीन महिन्याचा रेट ९.३० टक्के होता.तो कमी होऊन ९.२० टक्के झाला आहे. सहा महिने ते २ वर्षांचा रेट कमी होऊन ९.३० टक्के करण्यात (customers)आला आहे. हा रेट आधी ९.४० टक्के होता.MCLR रेट बदलल्याने होम लोन, पर्सनल लोन, कार लोनच्या ईएमआयवर परिणाम होणार आहे. जर एमसीएलआर वाढवला तर कर्जावरील व्याजदर वाढते आणि कमी झाला तर कर्जाचे हप्ता कमी होतात. एमसीएलआर हा डिपॉझिट रेट, ऑपरेशनल कॉस्ट आणि कॅश रिजर्व्ह रेशो यावर आधारित असतो. यामुळे कर्जाचे हप्ता कमी होणार आहे.

हेही वाचा :

मधुचंद्राच्या रात्री नववधूची विचित्र मागणी बायकोचं बोलणं ऐकताच नवऱ्याला सुटला घाम

धनंजय मुंडेंची लेक आहे फॅशनेबल, वैष्णवी मुंडे सध्या काय करते?

सकाळी पोट साफ होत नाही? झोपण्याआधी करा ‘हे’ घरगुती उपाय

ना महापूर ना भूकंप जगावर येणार दुसरंच मोठं महासंकट बाबा वेंगा भाकीत

धक्कादायक! खासगी बसमध्ये पोटच्या मुलांसमोर आईवर सामूहिक बलात्कार…

कोल्हापूर हादरलं भोंदूबाबाकडून अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार जादूटोणा करत वारंवार कृत्य