अजित पवारांना मोठा धक्का! भुजबळांनी दिला राजीनामा
समीर भुजबळ यांनी राष्ट्रवादी(current political news) मुंबई अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे. तसंच नांदगाव – मनमाड विधानसभा निवडणूक अपक्ष लढणार असल्याची घोषणा केली आहे.
काही दिवसांपूर्वीच अजित पवार(current political news) यांनी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना समीर भुजबळ यांचा राजीनामा घ्या अशा सूनाचा केल्या होत्या. त्यानंतर आता समीर भुजबळ यांनी राजीनामा दिला आहे. दरम्यान यावेळी त्यांनी पत्रात आपण नांदगाव निवडणूक का लढणार आहोत याचं कारणही सांगितलं आहे.
त्यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे की, साधारण वर्षभरापूर्वी तुम्ही सर्वांनी माझ्यावर विश्वास ठेवून मुंबई अध्यक्षपदाची जबाबदारी माझ्याकडे सुपूर्त केली होती. ही जबाबदारी पार पडत असताना अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये आपण संघटन मजबुतीने उभे केले. यामध्ये जिल्हाध्यक्ष पासून बूथपर्यंत संघटनेची बांधणी आपण केली. मात्र भुजबळ कुटुंबीयांच्या ऋणानुबंध असलेल्या नांदगावमध्ये परिस्थिती अतिशय बिकट आहे. गेल्या पाच वर्षात या मतदारसंघातले वातावरण अतिशय दूषित झालेले असून येथील नागरिक भयभीत आहे.
नांदगाव मधील कार्यकर्ते पदाधिकारी आणि नागरिकांनी आपली भेट घेऊन याबाबतली कैफियत आपल्यासमोर मांडली होती. नांदगावमधील नागरिकांची वाढत असलेली मागणी आणि नांदगावमधील दहशतीचे वातावरण बदलण्यासाठी या मतदारसंघात विधानसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय मी घेतला आहे. तरी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा मुंबई अध्यक्ष पदाचा मी राजीनामा देत आहे. तो आपण स्वीकारावा अशी नम्र विनंती आपण आतापर्यंत केलेल्या सहकार्याबद्दल मी आपला ऋणी आहे. असं समीर भुजबळ यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.
हेही वाचा :
भाजपच्या विरोधामुळे अजित दादांचा मोठा निर्णय?
‘घड्याळ’ चिन्हाबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्त्वाचा निर्णय, तर शरद पवारांना…
आधी बॉम्बस्फोट, नंतर गोळीबार…; राजधानीत दहशतवादी हल्ला, 10 जणांचा मृत्यू, 14 जखमी