क्रिकेट विश्वाला मोठा धक्का! भारताच्या स्टार खेळाडूने आत्महत्या करत संपवलं जीवन
भारताचे माजी क्रिकेटपटू डेव्हिड जॉन्सन यांचं निधन झालं आहे(cricket world). त्यांनी वयाच्या ५२ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला आहे. गुरुवारी (२० जून) बंगळुरुत त्यांचं निधन झालं आहे. डेव्हिड जॉन्सन यांचा जन्म १६ ऑक्टोबर १९७१ रोजी झाला होता. दरम्यान १९९० साली त्यांना भारतीय संघाकडून खेळण्याची संधी मिळाली होती. आपल्या क्रिकेट कारकिर्दीत त्यांना भारतीय संघाकडून केवळ २ कसोटी सामने खेळण्याची संधी मिळाली.
डेव्हिड जॉन्सन यांच्या अचानक जाण्याने क्रिकेट(cricket world) चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. माजी क्रिकेटपटू अनिल कुंबळेंसह, गौतम गंभीर, बीसीसीआय सचिव जय शाह यांनी देखील त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
डेव्हिड जॉन्सन हे बंगळुरुत राहत होते. असं म्हटलं जात होतं की, त्यांची मानसिक स्थिती चांगली नव्हती. त्यामुळे त्यांनी आत्महत्या केली. घटना घडताच कोट्टानूर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे.
डेव्हिड जॉन्सन यांना भारतीय संघाकडून २ कसोटी आणि १ वनडे सामना खेळण्याची संधी मिळाली. १९९६ मध्ये ते भारतीय संघासाठी शेवटचा वनडे सामना खेळण्यासाठी मैदानावर उतरले होते. वनडे क्रिकेटमध्ये कमी सामने खेळण्याची संधी मिळाली असली तरीदेखील त्यांनी देशांतर्गत क्रिकेटमध्ये दमदार कामगिरी केली.
Deepest condolences to family and friends of our former Indian fast bowler David Johnson. His contributions to the game will always be remembered
—(@JayShah) June 20, 2024
देशांतर्गत क्रिकेटमध्ये त्यांनी कर्नाटक संघाचं प्रतिनिधित्व केलं. दरम्यान १९९५-९६ मध्ये झालेल्या रणजी हंगामात त्यांनी शानदार गोलंदाजी केली होती.
हेही वाचा :
सांगली जिल्ह्यात पिसाळलेल्या लांडग्याचा धुमाकूळ
महायुतीतील ‘राष्ट्रवादी’ जागा निश्चित करत सुटली; भाजप आणि शिवसेना ‘टेन्शन’मध्ये…
ठाकरे-पवार मराठा आरक्षणाचे मारेकरी, चंद्रशेखर बावनकुळे यांचा गंभीर आरोप