भाजपने उचलले मोठे पाऊल; आठजण निलंबित

चंदीगड: विधानसभा निवडणुकीच्या(politics) पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाकडून हरियाणामध्ये मोठी कारवाई करण्यात आली आहे. अधिकृत उमेदवाराच्या विरोधात लढणाऱ्या आठ नेत्यांची पक्षाने हकालपट्टी केली आहे. या नेत्यांनी हरियाणा विधानसभा निवडणुकीत पक्षाच्या उमेदवारांविरुद्ध अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवली आहे. निवडणूक लढवलेल्या 8 नेत्यांची पक्षातून 6 वर्षांसाठी हकालपट्टी करण्यात आली आहे. या यादीत माजी मंत्री रणजित चौटाला आणि माजी आमदार देवेंद्र काद्यान यांच्या नावाचाही समावेश आहे.

ताऊ देवीलाल यांचा मुलगा आणि माजी कॅबिनेट मंत्री रणजितसिंह चौटाला रानिया विधानसभा(politics) मतदारसंघातून निवडणूक लढवत आहे. गेल्या निवडणुकीत ते अपक्ष म्हणून विजयी झाले होते. त्यानंतर त्यांनी भाजपला पाठिंबा दिला. ते कॅबिनेट मंत्री झाले. हरियाणात नेतृत्व बदलल्यानंतर नायब सैनी मुख्यमंत्री झाले तेव्हाही रणजीत चौटाला सरकारमध्ये मंत्री होते.

लोकसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि लोकसभा निवडणूक लढवली, मात्र त्यांचा पराभव झाला. विधानसभा निवडणुकीत चौटाला यांनी उमेदवारी न दिल्याने चौटाला यांनी बंडखोरी करत अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. त्यानंतर मुख्यमंत्री नायब सैनी यांच्या लाडवा मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढविणाऱ्या संदीप गर्ग यांच्यावरही भाजपने कारवाई केली आहे.

रणजीतसिंह चौटाला, संदीप गर्ग यांच्यानंतर गुरुग्राममधून निवडणूक लढवणारे नवीन गोयल यांच्यावरही भाजपने कारवाई केली आहे. नवीन गोयल यांना उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता होती. पण पक्षाने गुरुग्राममध्ये मुकेश शर्मा यांना तिकीट देण्याची घोषणा केली. त्यामुळे नवीन गोयल यांनीदेखील बंडखोरीचा मार्ग पत्करला. पणभाजपने त्यांचीही हकालपट्टी केली आहे.

हरियाणामध्ये ५ ऑक्टोबरला विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. 8 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. निकालही त्याच दिवशी येईल. गेल्या दोन निवडणुकांपासून गुरुग्रामची जागा भाजपकडे आहे. उमेश अग्रवाल 2014 मध्ये तर सुधीर सिंगला 2019 मध्ये विजयी झाले होते.

हेही वाचा :

‘या’ माजी खासदारावर गुन्हा दाखल; काय आहे प्रकरण?

‘हिंदू समाज हा महामूर्ख’ संभाजी भिडे यांचं वादग्रस्त वक्तव्य

भाजपला दे धक्का… हर्षवर्धन पाटलांच्या लेकीनं स्टेटस ठेवलं; चंद्रकांत पाटलांनीही स्पष्टच सांगितलं