‘बिग बॉस 17’ फेम अभिनेत्री रुग्णालयात दाखल, असह्य वेदनेने विव्हळली; व्हिडीओ व्हायरल…

‘बिग बॉस १७’च्या रिअॅलिटी शोमध्ये आपल्या क्यूटनेस आणि स्टाईलने(hospital) सर्वांचे लक्ष वेधून घेतलेल्या सोनिया बन्सलच्या प्रकृतीत अचानक बिघाड झाल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. रात्री उशिरा तिची तब्येत अचानक बिघडल्यामुळे तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.

सोशल मीडियावर सध्या सोनियाच्या रुग्णालयात(hospital) असलेल्या स्थितीचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये सोनिया वेदनेमुळे रडताना आणि बेशुद्ध अवस्थेत दिसत आहे. तिच्या डोळ्यांत वेदना स्पष्टपणे दिसत असून, चेहऱ्यावर अस्वस्थता जाणवत आहे. या व्हिडिओने तिच्या चाहत्यांमध्ये चिंतेची लाट निर्माण केली आहे.

एका वृत्तानुसार, सोनिया बन्सल गेल्या चार महिन्यांपासून पॅनिक अटॅकच्या समस्येने त्रस्त आहे, आणि मानसिक आरोग्याशी संबंधित समस्याही तिला आहे. काल रात्री एका पुरस्कार सोहळ्यात सहभागी होण्यासाठी गेल्यानंतर तिला अचानक अस्वस्थता जाणवू लागली, ज्यामुळे तिला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले.

‘बिग बॉस १७’मध्ये आपल्या उलगडलेल्या व्यक्तिमत्त्वामुळे सोनिया प्रसिद्धीच्या झोतात आली होती, पण तिचा खेळ फार काळ टिकू शकला नाही आणि ती शोमधून बाहेर पडली होती. सोनिया सोशल मीडियावर ग्लॅमरस फोटो शेअर करत असते आणि तिच्या क्यूटनेसवर तिचे चाहते फिदा आहेत.

सध्या सोनियावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तिच्या चाहत्यांनी लवकरात लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना केली आहे आणि सोशल मीडियावर तिच्या प्रकृतीची माहिती घेण्यासाठी उत्सुक आहेत.

हेही वाचा :

महिलेची साडीतील ‘तौबा तौबा’ हुक स्टेप पाहून विकी झाला थक्क Video

‘या’ 3 राशींचा सुरु होणार गोल्डन टाईम; कमावतील बक्कळ पैसा

शरीरावर टॅटू काढल्यास मिळणार नाहीत ‘या’ सरकारी नोकऱ्या