लाडकी बहिण आणि शेतकऱ्यांसाठी सरकारकडून सर्वात मोठी घोषणा!

राज्यात विधानसभा निवडणुकूची रणधुमाळी सुरु झाली असून येत्या काही दिवसांत राज्यातील(political issue) निवडणूका पार पडतील. त्यासाठी राजकीय पक्षातील नेते मंडळी निवडणूकीचा जोरदार प्रचार करत आहेत. एवढंच नाही तर, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा देखील त्यांच्या उमेदवारांसाठी सभा घेत असल्याचं चित्र पहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर अमित शाहांच्या हस्ते भाजपच्या संकल्पपत्राचे प्रकाशन करण्यात आलं. यावेळी लाडकी बहिणी योजना आणि शेतकऱ्यांसाठी नवीन घोषणा करण्यात आली आहे.

येत्या 10 दिवसात राज्यात विधानसभा निवडणूक(political issue) येऊन ठेपल्या असताना भाजपकडून निवडणुकीसाठीचा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला. यावेळी अमित शाह यांनी भाजप संकल्पपत्राचं प्रकाशन केलं. दरम्यान, यामध्ये लाडकी बहिणी योजनेबद्दल एक मोठी घोषणा करण्यात आली आहे.

लाडकी बहीण योजनेत महिलांना 1500 रुपये देण्यात येत आहेत. मात्र, आता 1500 ऐवजी महिलांना 2100 रुपये देण्यात येणार असल्याचं म्हटलं आहे. या शिवाय शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जाणार आहे. पुढील पाच वर्षांसाठी विविध आश्वासने देण्यात आली आहेत. या संकल्पपत्रात महिला, विद्यार्थी, वृद्ध यांच्यावर भर देण्यात आला आहे. त्यासोबतच यात रोजगार, व्यवसाय यांसह विविध मुद्द्यांवरही पुढील 5 वर्षात भर देण्यात येईल, असं देखील सांगण्यात आलं आहे.

भाजपच्या संकल्पपत्राचं प्रकाशन करण्यात आलं. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, खासदार पियुष गोयल, विनोद तावडे, चंद्रशेखर बावनकुळे, आशिष शेलार यांसह भाजपचे अनेक नेते उपस्थितीत होते. लडकी बहीण योजना आणि शेतकरी यांच्या व्यतरिक्त अणखी काही महत्त्वाच्या घोषणा करण्यात आल्या आहेत. यामध्ये महिलांसाठी आर्थिक साक्षरता निर्माण करण्यासाठी प्रशिक्षण देणार आहेत.

पुढे शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जाणार असल्याचं म्हटलं गेलंय. महिलांच्या सुरक्षेसाठी तब्बल 25000 महिलांचा पोलीस दलात समावेश केला जाणार आहे. तर दुसरीकडे शेतकरी सन्मान योजनेतून शेतरकऱ्यांना वर्षाला 12 हजार वरुन 15 हजार मिळतील. प्रत्येक गरीबाला अन्न आणि निवारा देण्यात येईल.

वृद्ध लोकांच्या पेन्शन धारकांना 1500 रुपये नसून त्यांना आता 2100 रुपये दिले जाणार आहेत. यावेळी महिन्याला 10 लाख विद्यार्थ्यांना 10 हजार रुपये मिळणार आहेत. विद्यावेतन ग्रामीण भागात 45 हजार गावात पांधण रस्ते बांधणार असल्याचं देखील आश्वसान यावेळी देण्यात आलं आहे.

हेही वाचा :

बॉयफ्रेंडसोबत मिळून मित्राचे 300 तुकडे, हत्या करुन शॉपिंगला गेली प्रसिद्ध अभिनेत्री

मी काय म्हातारा झालोय का? सरकार बदलल्याशिवाय म्हातारा होणार नाही, शरद पवारांची जोरदार बॅटिंग

‘मेरे बॉयफ्रेंडसे गुलुगुलु करेगी तो…’ तरुणासाठी दोन तरुणींची जोरदार हाणामारी; Video तुफान व्हायरल