राहुल गांधींविरोधात भाजप आक्रमक; आज राज्यभरात आंदोलन

अमेरिका दौऱ्यावर असताना काँग्रेस(politics) नेते राहुल गांधी यांनी भारतातील आरक्षण संपवण्याबाबत वक्तव्य केले होते. आरक्षणासंदर्भात केलेल्या या विधानानंतर भारतीय जनता पक्ष चांगलात आक्रमक झाला आहे. त्याच पार्श्वभूमीवर आज (13 सप्टेंबर) राज्यभरात राहुल गांधी यांच्याविरोधात भाजपतर्फे आंदोलन करण्यात येणार आहे.

याचदरम्यान भाजप(politics) प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे अकोल्यात तर आशिष शेलार आणि पंकजा मुंडे हे मुंबईत आंदोलन करणार आहेत. तसेच पुण्यात भाजपच्या वतीने उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात येणार हे. पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज दुपारी 12 वाजता आंदोलनाला सुरुवात करण्यात आली. तर दुसरीकडे राहुल गांधी यांच्या समर्थनार्थ काँग्रेस पक्षातर्फेही आज राज्यभरात आंदोलन होणार आहे. भारतीय जनता पक्षाच्या आंदोलनाला प्रत्युतर म्हणून काँग्रेसतर्फे हे आंदोलन करण्यात येणार आहे.

दरम्यान, जातिनिहाय जनगणना आणि आरक्षण या दोन मुद्द्यांवरून काँग्रेसचे नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे मागच्या काही दिवसांपासून कमालीचे आक्रमक आहेत. दरम्यान, सध्या अमेरिकेच्या दौऱ्यावर असलेल्या राहुल गांधी यांनी भारतातील आरक्षण कधीपर्यंत सुरू राहणार? या एका विद्यार्थ्याने विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मोठं विधान केलं आहे. जेव्हा भारतात आरक्षणाच्या दृष्टीने समानता असेल, तेव्हाच काँग्रेस पक्ष देशामधील आरक्षण संपुष्टात आणण्याबाबत विचार करेल. सध्यातरी अशी स्थिती नाही, असे राहुल गांधी यांनी सांगितले.

राहुल गांधी यांनी परदेशात त्यांच्या एका वक्तव्यात म्हटले होते की, भारतात विषमता आहे. भारतात कधी विषमता आणि सामाजिक भेदभाव संपुष्टात आला तर आरक्षण संपवण्याचा विचार केला जाऊ शकतो, मात्र भाजपने राहुल गांधींच्या या वक्तव्याचा समाचार घेत काँग्रेस दलित आणि जमातींना दिलेले आरक्षण संपवण्याचा विचार करत आहे.

आरक्षणावर राहुल गांधींनी दिलेल्या वक्तव्यावर भाजप आक्रमक झाले. ओबीसी, अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींना दिलेले आरक्षण संपविण्याचा काँग्रेसचा प्रयत्न असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. भाजपच्या म्हणण्यानुसार कर्नाटकात दलित जातींना मुस्लिमांना दिलेले आरक्षण देण्याचे काम काँग्रेसने केले आहे आणि दलित जातींना दिलेले आरक्षण देण्याचे काम तृणमूल काँग्रेसने केले आहे. आता देशभरात असेच काम करण्याचे तिचे स्वप्न आहे. भाजप काँग्रेसला हे कधीही करू देणार नाही, असा पुनरुच्चार पक्षाने केला आहे.

खरे तर राहुल गांधी यांनी परदेशात केलेल्या एका वक्तव्यात भारतात विषमता असल्याचे म्हटले होते. भारतात कधी विषमता आणि सामाजिक भेदभाव संपुष्टात आला तर आरक्षण संपवण्याचा विचार केला जाऊ शकतो, मात्र भाजपने राहुल गांधींच्या या वक्तव्याचा समाचार घेत काँग्रेस दलित आणि जमातींना दिलेले आरक्षण संपवण्याचा विचार करत आहे.

हेही वाचा:

कोल्हापुरात गणेश विसर्जन मिरवणुकीत लेसर लाईट्सवर बंदी!

शेअर बाजारात नवा स्कॅम; ‘या’ व्हॉट्सॲप ग्रुपच्या माध्यमातून होतेय फसवणूक

अजितदादांना मोठा झटका, कट्टर समर्थक शरद पवारांच्या गळाला?