भाजप आणि शिवसेना हे सख्खे भाऊ तर राष्ट्रवादी…; भाजपच्या ‘या’ मोठ्या नेत्याच वक्तव्य
लातूर : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातलं राजकीय वातावरण(leader) तापल्याचं चित्र आहे. महाविकास आघाडीने आम्हीच निवडणूक जिंकणार असा आत्मविश्वास व्यक्त केला आहे. तर दुसरीकडे महायुतीनेही कंबर कसली आहे. अशात महायुतीत ऑल इज नॉट वेल अशी स्थिती आहे का? असा प्रश्न आता उपस्थित होतो आहे.
शिवसेना नेते तानाजी सावंत यांनी अजित पवारांबाबत एक(leader) वक्तव्य केलं होतं. त्यांच्याबरोबर बसलं तरी बाहेर आल्यावर उलटी येते असं त्यांनी म्हटलं होतं. हे प्रकरण मिटत नाही तोपर्यंतच आता भाजपा नेत्याने अजित पवार आणि त्यांच्या पक्षाबाबत आक्षेप घेतला आहे. लातूर भाजपचे जिल्हाध्यक्ष दिलीप देशमुख यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.
भाजप आणि शिवसेना हे सख्खे भाऊ आहेत तर राष्ट्रवादी हा भाजपाचा सावत्र भाऊ आहेत. राष्ट्रवादी सोबत भाजपाने युती का केली हेच कळायला मार्ग नाही असं वक्तव्य लातूर भाजपचे जिल्हाध्यक्ष दिलीप देशमुख यांनी केलं. राष्ट्रवादीला सोबत घेतल्याने भाजपचं वाटोळं झालंय असं कार्यकर्त्यांना वाटतंय असंही ते म्हणाले. राज्यात तीन पक्षाचे सरकार आहे.
अजित पवार यांच्या राष्ट्रवादी सोबत भाजपने कशासाठी युती केली हेच कळायला मार्ग नाही. इतकी भानगड झाली आहे की आता कार्यकर्त्यांना वाटतंय की राष्ट्रवादीला युतीमध्ये घेऊन आमच्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांच चांगलं झालं नाही, लय वाटोळं झालंय अशी प्रतिक्रिया भाजपाचे ग्रामीण देशमुख यांनी दिली.
मंत्री आणि शिवसेनेचे नेते तानाजी सावंत यांनीही राष्ट्रवादीबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. राष्ट्रवादीच्या नेत्यांसोबत कॅबिनेटमध्ये मांडीला मांडी लावून बसतो, पण बैठक झाल्यानंतर बाहेर आल्यावर उलटी होते असं वक्तव्य शिवसेना शिंदे गटाचे आमदार तानाजी सावंत यांनी केलं होतं. तानाजी सावंत यांच्या या वक्तव्यानंतर राष्ट्रवादीच्या नेत्यांनी त्यांच्यावर टीका केली असून मुख्यमंत्र्यांनी सावंतांना सज्जड दम द्यावा अशी मागणी केली आहे.
हेही वाचा:
बीएसएनएलच्या ‘या’ प्लॅननी उडवली Jio, Airtel ची झोप
“हार्दिक पांड्यावर माझं प्रेम, तो माझा..”; प्रसिद्ध अभिनेत्रीचा मोठा खुलासा
तुम्ही लवकर उठता तो तुमच्या बायकोचा प्रॉब्लेम; सुप्रियाताईंनी दादांच्या डायलॉगचा घेतला समाचार