भाजपचं नवं मिशन विरोधकांचं टेन्शन वाढवणार; बावनकुळेंनी दिले सर्व मंत्र्यांना हे आदेश
स्थानिक संस्थांच्या निवडणुका कोणत्याही क्षणी जाहीर होण्याची शक्यता आहे. भाजपने (political) त्याआधीच कंबर कसली असून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज्यांतील भाजपच्या सर्व मंत्र्यांना महत्त्वाच्या सूचना केल्या आहेत. दर 15 दिवसांनी प्रत्येक मंत्र्यांनी खेड्यात जाऊन त्या भागातील नागरिकांशी संवाद साधावा, असे आवाहन केलं आहे.
शिर्डीत भाजपचं (political) महाविजय अधिवेशन होत आहे. या अधिवेशनात बावनकुळे म्हणाले, “स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुती म्हणून समोरं जायचं आहे. पण याआधी आपली तयारी करायची आहे. महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि राज्यातील सुमारे 70 हजार ग्रामपंचायतीच्या निवडणुका आगामी काळात होणार आहेत. त्याची तयारी करायची आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत नेत्यांना संधी दिली, आता आम्हाला कार्यकर्त्यांना संधी द्यायची आहे.
“जनतेनं दिलेल्या बहुमतासाठी आणि कार्यकर्त्यांच्या आभारासाठी शिर्डीत महाविजय अधिवेशन भरवलं आहे. कार्यकर्त्यांमुळेच अध्यक्षपदाचे यशस्वी काम करता आलं. गेल्या दोन वर्षात पक्षाच्या प्रत्येक पातळीवर कार्यकर्त्यांनी जीवाचं रान केलं. मध्यरात्री जाहीर केलेलं आंदोलन सकाळी नऊ वाजता उठून कार्यकर्त्यांनी यशस्वी केलं, हा कार्यक्रम यशस्वी केला. 35 लाख घरापर्यंत हा कार्यक्रम नेला”.
‘अयोध्येत प्रभू रामचंद्र विराजमान होताना, संपूर्ण महाराष्ट्र भगवामय केला. 15 हजार नेत्यांनी यासाठी पुढाकार घेतला. संघटनेवर विश्वास होता, महायुतीवर विश्वास होता, मोदींवर विश्वास होता. मात्र लोकसभेला आपण फसलो, विरोधकांनी खोटारडेपणा केला. पुण्यातील अधिवेशनात विधानसभा जिंकण्याचा संकल्प झाला. भाजप नेते केंद्रीय मंत्री अमित शाह पुण्यातील अधिवेशनात हुंकार भरला. श्रद्धा आणि सबुरीवर भाजपच्या नेत्यांनी कार्यकर्त्यांच्या विश्वासावर भरारी घेतली. राज्यातील 149 विधानसभा लढल्या, त्यातील 132 जागा जिंकल्या. महाविजय हा एकीचं बळ असल्याचं ते म्हणाले.
‘2021 मध्येच आपला मुख्यमंत्री झाला असता. पण त्यावेळी बेईमानी झाली, पाठीत खंजीर खुपसला गेला. महाराष्ट्रातील कार्यकर्ता हळहळत होता. देवेंद्र फडणवीसांचा हिन पद्धतीनं अपमान केला जात होता. परंतु, त्यांनी चक्रव्यूह भेदला, देवेंद्र आधुनिक अभिमन्यू ठरले. स्टेडिअम बदललं, पण मुख्यमंत्रिपदी देवेंद्र विराजमान झाले’, याची आठवण बावनकुळेंनी करून दिली.
विधानसभेतील विजयानंतर आता भाजप आणि महायुतीने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांकडे लक्ष देण्यास सुरुवात केली आहे. खास करून भाजपने राज्यातील सर्व समाजास जोडण्यासाठी एक रणनीती आखल्याचे म्हटले जात आहे. या फॉर्म्युलामुळे विरोधक देखील आश्चर्यचकित झाल्याचे दिसून येत आहे. भाजपने राज्यात कार्यकारी अध्यक्ष नियुक्त केला आहे.
भारतीय जनता पक्षाने माजी मंत्री आणि भाजप नेते रवींद्र चव्हाण यांच्या कार्यकारी अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली आहे. शिर्डी येथे भाजपचे महाअधिवेशन सुरू आहे. त्यामध्ये भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष जेपी नड्डांनी रवींद्र चव्हाण यांची महाराष्ट्र भाजपच्या कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. मात्र यामुळे आता चंद्रशेखर बावनकुळे हेच महाराष्ट्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष राहणार आहेत.
हेही वाचा :
बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी! हॉल तिकीट आता…
‘…तर मी निवडणूक लढवणार नाही’; विधानसभेच्या तोंडावर केजरीवालांनी डाव टाकला
‘छोले’ बनवणं जीवावर बेतलं; गॅसवर पातेलं ठेवून दोन तरुण झोपी गेले, सकाळी झाला मृत्यू