भाजपला मोठा धक्का बसणार; ‘या’ नेत्याने प्रोफाईलवरून हटवलं कमळ

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपला मोठा धक्का बसण्याची(leadership challenge) शक्यता आहे. भाजपचे बडे नेते पक्ष सोडून शरद पवारांच्या पक्षात सामिल होणार असल्याचं कळतंय. कोल्हापूरमधील भाजपचे नेते समरजित घाटगे भाजपपासून फारकत घेणार असल्याचं बोललं जात आहे.

समरजित घाटगे यांनी सोशल मीडिया हॅण्डलवरून (leadership challenge)कमळ हटवलं आहे. वारसा शाहूंचा, लढा सर्वसामान्यांचा असं समरजित घाटगे यांनी त्यांच्या वॉलवर लावलं आहे. समरजित घाटगे यांनी कमळ हटवल्यामुळे वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलं आहे.

विधानसभा निवडणुकीत कागलमधून तिकीट मिळण्याची शक्यता कमी असल्याने समरजितसिंह घाटगे भाजपला रामराम करण्याच्या तयारीत आहेत. 3 सप्टेंबरला शरद पवारांच्या उपस्थितीमध्ये कागलमधल्या मेळाव्यात घाटगे पक्षप्रवेश करतील, अशी चर्चा सुरू आहे.

भाजपच्या नेत्यांनी बुधवारी समरजित घाटगे यांच्या घरी जाऊन त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला होता. भाजपचे राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक, माजी आमदार अमल महाडिक, यांच्यासह इतर नेते समरजित घाटगे यांच्या भेटीसाठी त्यांच्या निवासस्थानी गेले होते.

इतक्या लवकर पक्ष सोडण्याचा निर्णय न घेता आणखी काही राजकीय घडामोडी विधानसभा निवडणुकीपर्यंत घडतात का? याचा अंदाज घेऊन मगच निर्णय घ्यावा, असं भाजपचं मत आहे.

हेही वाचा :

बदलापूर प्रकरणाची पुनरावृत्ती शिक्षकाची १४ वर्षीय विद्यार्थीनीसोबत गैरवर्तवणूक

दुसऱ्या महिलेचे आधार कार्ड खात्याला केले लिंक घेतला एक लाख रुपयाचा लाभ

SBI समोर चेंगराचेंगरी! ग्राहकांची 2 किलोमीटरपर्यंत रांग; महिलांची छेडछाड, दोघी रुग्णालयात