बोगस धान्य वितरणाला बसणार आळा; रेशनकार्डधारकांना ई-केवायसी अनिवार्य
शितलवाडी : शिधापत्रिकेत नावे असलेल्या कुटुंबातील सदस्यांनी ई-केवायसी(myration) पडताळणी प्रक्रिया पूर्ण न केल्यास संबंधितांना धान्य वितरणाचा लाभ मिळणार नाही, असे पुरवठा विभागाकडून कळविण्यात आले आहे. त्यामुळे आता प्रत्येक शिधापत्रिका धारकाला ई-केवायसी करणे बंधनकारक झाले आहे. त्यामुळे स्वस्त धान्य वितरणातील बोगस प्रकरणांना आळा बसणार आहे.
नागपूर जिल्हाधिकारी कार्यालयाकडून(myration) सर्व तालुक्यातील पुरवठा निरीक्षकांना ई-केवायसी संदर्भात नव्याने निर्देश देण्यात आले आहेत. केवायसी पडताळणीची मोहीम तातडीने पूर्ण करावी व त्यांचा अहवाल शासनाच्या पोर्टलवर अपलोड करावा, असे जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.
एप्रिल २०२४ च्या पत्रांद्वारे केंद्र सरकारने पुरवठा विभागाच्या तहसील स्तरावरील क्षेत्रीय कार्यालयांना कुटुंबनिहाय शिधापत्रिकेतील लाभार्थीची ई-केवायसी पडताळणी करण्याचे निर्देश दिले होते. अवघ्या काही सेकंदाची ही प्रक्रिया असून ई-केवायसी पूर्ण झाल्यावरच येत्या काळात लाभार्थीच्या नावाने धान्य वितरणाचा लाभ दिला जाणार आहे.
स्थलांतरित कुटुंबांना देखील ते वास्तव्य करत असलेल्या क्षेत्रातील स्वस्त धान्य दुकानात जाऊन ई-केवायसी पडताळणी पूर्ण करता येणार आहे. ई-केवायसी अपडेट करण्यामागे धान्य वितरणात पारदर्शकता आणणे हा एकमेव उद्देश आहे. अनेक कुटुंबांमध्ये मयत लाभार्थीच्या नावावर देखील धान्य वितरण केले जाते.
संबंधित कुटुंबाकडून याबाबतची माहिती पुरवठा विभागाला दिली जात नाही. नव्या मोहिमेमध्ये प्रत्येक तालुक्यातील मयत लाभार्थी वगळले जातील व धान्य वितरणाचा लाभ इतर वंचित लाभार्थ्यांना मिळू शकेल.
स्वस्त धान्य दुकानातील ४ जी ई-पॉस मशीनद्वारे प्रत्येक शिधापत्रिकाधारकाने आपल्या कुटुंबातील सदस्यांची केवायसी करून घ्यावी. केवळ आधार क्रमांक टाकून ही प्रक्रिया पूर्ण केली जाते. धान्य दुकानात ई-केवायसीसाठी नि:शुल्क प्रक्रिया आहे.
लाभार्थ्यांनी आधार कार्ड सोबत घेऊन रेशन दुकानातून केवायसी पडताळणी करून घ्यावी. रेशन वाटप सुरू झाल्यावर केवायसी पडताळणीसाठी वेळ लागू शकतो. एकाच वेळी रेशन वाटप आणि केवायसी पडताळणी करणे शक्य होणार नाही.
हेही वाचा :
विधानसभा निवडणुकीबाबत महत्वाचा निर्णय, ओबीसी संघटनांची बैठकl.
सांगली,पुढील आठवड्यात कवलापूर विमानतळ जागेची पाहणी
तुम्हाला इतरांपेक्षा जास्त घाम येतो का? तर वाचा डॉक्टरांचे मत..