बॉलिवूड अभिनेत्री नर्गिस फाखरीच्या बहिणीला न्यूयॉर्कमध्ये अटक
न्यूयॉर्क : अभिनेता(Bollywood) रणबीर कपूर स्टारर ‘रॉकस्टार’ फेम नर्गिस फाखरीच्या बहिणीला न्यूयॉर्कमध्ये अटक करण्यात आली आहे. न्यूयॉर्कमधील क्वीन्स येथे झालेल्या दुहेरी हत्याकांडप्रकरणी नर्गिसची बहीण आलिया फाखरी हिला अटक करण्यात आली आहे.
आलिया(Bollywood) हिने तिच्या एक्स-बॉयफ्रेंडची हत्या केल्याचा आरोप आहे. तिने दोन मजली गॅरेजला आग लावून तिचा 35 वर्षीय एक्स-बॉयफ्रेंड एडवर्ड जेकब्स आणि 33 वर्षीय अनास्तासिया यांची हत्या केल्याचा आरोप आहे. या घटनेने सर्वांनाच धक्का बसला आहे. रिपोर्ट्सनुसार, आलिया फाखरीने एडवर्ड आणि अनास्तासियाला गॅरेजमध्ये अडकवले आणि गॅरेजला आग लावली. यामध्ये दोघांचा होरपळून मृत्यू झाला.
दरम्यान, या आगीत गुदमरल्याने त्यांचा मृत्यू झाला. याच हत्याप्रकरणात आलियाला अटक करण्यात आली. त्यानंतर तिला क्वीन्स क्रिमिनल कोर्टात हजर करण्यात आले, जिथे तिला जामीन नाकारण्यात आला.
एडवर्ड जेकब्स आणि अनास्तासिया यांच्यात सुरुवातीला प्रेमसंबंध नव्हते. मात्र, त्यांच्यात मैत्री होती. एडवर्डच्या आईच्या म्हणण्यानुसार, दोघे (आलिया आणि एडवर्ड) एक वर्षापूर्वी वेगळे झाले होते, परंतु आलियाने तिचा पाठलाग सुरूच ठेवला होता. गॅरेजचे अपार्टमेंटमध्ये रूपांतर करण्यासाठी जेकब एका मालमत्तेवर काम करत होता. तेव्हा आग लागली आणि एडवर्ड आणि त्याच्या गर्लफ्रेंडचाही मृत्यू झाला.
आलिया फाखरीने गॅरेजला आग लावली, एडवर्ड आणि अनास्तासियाला आत अडकवले आणि त्यांची हत्या केली. आगीच्या धुरामुळे श्वासोच्छवासामध्ये अडचणी निर्माण झाल्या. त्यामध्ये या दोघांचा मृत्यू झाला. त्यानंतर आलियाला अटक करण्यात आली.
हेही वाचा :
लग्नसराईत सोन्याची आनंदवार्ता; ‘इतक्या’ रुपयांनी घसरले भाव
ईव्हीएमच्या व्हीव्हीपॅटमध्ये तुतारीचे मत भाजपला, उत्तम जानकरांचा गंभीर आक्षेप
अखेर एकनाथ शिंदेंची नाराजी दूर?; आज खातेवाटपाचा तिढा सुटण्याची शक्यता