विमानतळावर बॉम्बची अफवा, सुरक्षा व्यवस्था कडक

विमानतळावर (airport)आज दुपारी एका संशयास्पद चिठ्ठीमुळे खळबळ उडाली. चिठ्ठीत बॉम्ब असल्याचा दावा करण्यात आल्याने सुरक्षा यंत्रणेने तत्काळ हालचाली सुरू केल्या. विमानतळावरील सर्व प्रवाशांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आणि बॉम्बशोधक पथकाने संपूर्ण परिसराची तपासणी केली.

काही तासांच्या तपासणीनंतर बॉम्बची अफवा असल्याचे स्पष्ट झाले. तरीही, सुरक्षेच्या दृष्टीने विमानतळावरील सर्व व्यवस्था कडक करण्यात आल्या आहेत. संशयास्पद चिठ्ठी लिहिणाऱ्या व्यक्तीचा शोध घेण्यासाठी सहारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या घटनेमुळे विमानतळावरील काही सेवांवर तात्पुरता परिणाम झाला असला तरी, प्रवाशांची सुरक्षा प्राधान्याने लक्षात घेऊन योग्य ती खबरदारी घेण्यात आल्याचे विमानतळ अधिकाऱ्यांनी सांगितले.

हेही वाचा :

बनावट व्हिसा रॅकेटचा पर्दाफाश: नौदल अधिकारी अटकेत

धोकादायक आशयाचं खुलासा ,’ही’ 2 औषधंचा संयोजन: नसांमधील रक्त जाईल सुकून,

कमल हासन: “कल्की: २८९८एडी’मधील अमिताभ बच्चन यांचा अभिनय मंत्रमुग्ध करणारा”