कॉ. गोविंद पानसरे हत्या प्रकरणातील आरोपींना मुंबई उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर
कॉ. गोविंद पानसरे हत्या प्रकरणातील आरोपींना आज मोठा दिलासा मिळालाय. मुंबई उच्च न्यायालयाने(High Court) आरोपींना दीर्घ कारावासाच्या कारणावरून जामीन मंजूर केला. गोविंद पानसरे यांची 2015 मध्ये हत्या झाली होती. कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येच्या प्रकरणी गेल्या सहा वर्षांपासून अटकेत असलेल्या सहा आरोपींना उच्च न्यायालयाने आज जामीन मंजूर केला. आरोपी बऱ्याच काळापासून अटकेत असल्याने त्यांना जामीन मंजूर करण्याचा निर्णय न्यायालयाने घेतल्याचं समोर आलंय.
गोविंद पानसरे हे एक विवेकवादी, लेखक आणि सामाजिक कार्यकर्ते होते. त्यांची 16 फेब्रुवारी 2015 रोजी कोल्हापुरात गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. त्यानंतर चार दिवसांनी त्यांचा मृत्यू झाला. न्यायमूर्ती ए. एस. किलोर यांच्या एकल खंडपीठाने(High Court) सहा आरोपी सचिन अंदुरे, गणेश मिस्कीन, अमित देगवेकर, अमित बद्दी, भरत कुरणे आणि वासुदेव सूर्यवंशी यांच्या जामीन अर्जाला मंजुरी दिलीय. या सर्वांना 2018 ते 2019 दरम्यान वेगवेगळ्या तारखांना अटक करण्यात आली होती. तेव्हापासून ते तुरुंगात होते.
न्यायमूर्ती किलोर म्हणाले, मी सहा आरोपींचा जामीन अर्ज प्रदीर्घ तुरुंगवास भोगत असल्याने स्वीकारत आहे. आणखी एका आरोपी वीरेंद्रसिंह तावडेच्या जामीन अर्जावर स्वतंत्रपणे सुनावणी करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. या प्रकरणात ओळखल्या गेलेल्या 12 संशयितांपैकी 10 जणांना अटक करण्यात आली असून सध्या चार पुरवणी आरोपपत्र दाखल करून खटला सुरू आहे. मात्र, दोन गोळीबार केलेले आरोपी अजून देखील फरार आहेत.
हा खटला सुरुवातीला राजारामपुरी पोलिस ठाण्याच्या अखत्यारीत होता. त्यानंतर तो तपासासाठी महाराष्ट्राचे अतिरिक्त पोलीस महासंचालक यांच्या नेतृत्वाखालील विशेष तपास पथकाकडे सोपवण्यात आला. तपासामुळे असमाधानी असलेल्या पानसरे यांच्या कुटुंबीयांनी हे प्रकरण दहशतवादविरोधी पथकाकडे सोपवण्याची विनंती केली होती. ती तपासात लक्षणीय प्रगती न झाल्याने उच्च न्यायालयाने 3 ऑगस्ट 2022 रोजी मान्य केली.
गोविंद पानसरे यांची 16 फेब्रुवारी 2015 रोजी कोल्हापुरात हत्या झाली होती. पानसरे आणि त्यांची पत्नी उमा मॉर्निंग वॉक करून घरी परतत असताना मोटारसायकलवरून आलेल्या दोन हल्लेखोरांनी त्यांच्यावर हल्ला केला. घटनास्थळावरून पळून जाण्यापूर्वी अनेक राउंड गोळीबार केला. या हल्ल्यात गोविंद पानसरे गंभीर झाले होते. त्यानंतर चार दिवसांनंतर त्यांचा मृत्यू झाल्याचं समोर आलं.
हेही वाचा :
दहावी, बारावीच्या परीक्षा केंद्रात बुरखा घातलेल्या विद्यार्थिनींना प्रवेश देऊ नका, नितेश राणेंचे पत्र!
सस्ती चीजोंका शौक कुत्ते भी नही रखते! कुत्र्याने थेट घेतली अवकाशात भरारी, Viral Video
ज्या घरात नेहमी ही कामे केली जातात, तिथे कधीही भासत नाही पैशाची कमतरता