आईच्या जीववर उठला मुलगा, फोन हिसकावताच डोक्यात घातली बॅट, Video Viral

आजच्या युगात मोबाईल हा आपल्या रोजच्या जीवनाचा एक अविभाज्य भाग बनला आहे. आजकाल मोठेच काय तर लहान मुलेही या फोनच्या आहारी गेली आहेत. सकाळपासून ते रात्रीपर्यंत हा फोन आपल्या हातात असतो. हे फोन आता एक व्यसनच(addiction therapist) बनले आहे. उठता बसता खाता पिता प्रत्येक गोष्टीसाठी आता लोकांना आपल्याजवळ फोन हवा असतो. आजकाल लहान मुलंही या फोनच्या इतक्या आहारी गेली आहेत की, बाहेर फिरणं, खेळणं, बागडणं या सर्व गोष्टी ते विसरून गेले आहेत. मैदानी खेळदेखील आता मुलं या फोनवरच खेळायला बघतात.

फोनचे व्यसन(addiction therapist) लहान मुलांना इतके जास्त लागले आहे की अनेकदा याच्या नादात ते नेहमी नको ते करून बसतात. कधी कधी ते यासाठी इतके हिंसक होतात की, ते पाहून पालकांनाच त्यांची भीती वाटू लागते. सध्या अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यात आईने मोबाईल चालवण्यास मनाई केल्याने मुलगा थेट आपल्या आईच्याच जीवावर उठला आहे.

व्हिडिओमध्ये जर आपण पाहिले तर दिसते की, घरात बेडवर शाळेच्या गणवेशात एक लहान मुलगा फोन खेळात बसला आहे. जवळच टीव्हीदेखील चालू आहे. तितक्यात तिथे त्याची आई येते आणि त्याला मोबाईलवर खेळताना पाहून ती त्याला ओरडते आणि त्याच्याकडून मोबाईल हिसकावून त्याला अभ्यास करण्यास सांगते. मग मुलगा पुस्तक घेऊन बेडवर बसतो.

आई जेवणाचे ताट घेऊन जमिनीवर बसते आणि टीव्ही पाहू लागते. त्यानंतर मुलगा अचानक तिथून उठतो आणि किचनमध्ये जातो, तो पुन्हा येतो तेव्हा हॉलच्या बाजूला एक क्रिकेट बॅट ठेवलेली असते. मुलगा क्षणार्धाचाही विचार करत नाही आणि लगेच ती बॅट उचलून समोर बसलेल्या आपल्या आईच्या डोक्यात मारतो.

बॅट लागताच मुलाची आई जमिनीवर कोसळते मात्र मुलाच्या चेहऱ्यावरची एक रेगही हलत नाही. यानंतर मुलगा चक्क बेशुद्ध आईच्या हातातून मोबाईल फोन हिसकावतो आणि पुन्हा गेम खेळायला सुरुवात करतो. ही सर्व थरारक घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. याचाच व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून आता अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.

या घटनेचा व्हिडिओ @Baba Banaras नावाच्या एक्स अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये, मोबाईलचे व्यसन, पहा या मुलाने कसा घेतला स्वतःच्या आईचा जीव असे लिहिण्यात आले आहे. अनेकांनी यावर कमेंट्स करत यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, ” 15 वर्षांखालील मुलांना मोबाईल दिला नाही पाहिजे” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “हे स्क्रिप्टेड वाटत आहे”.

हेही वाचा :

‘हा’ स्पर्धक ठरणार ‘बिग बॉस’ मराठी 5 चा विजेता?

T-20 मधील जगातील अव्वल गोलंदाज लग्नबंधनात अडकला

अंकिता पाटलांनी भाजप सोडली, शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश निश्चित?