जोडीदार निवडताना मुलांची ‘या’ मुलींना असते जास्त पसंती

जोडीदार(partner) निवडताना प्रत्येकाची वेगळी आवड असते, विशेषतः मुले याबाबतीत खूप चोखंदळ असतात. काही मुलांना उंच मुली आवडतात, तर काहींना गोऱ्या, तर काहींना सावळ्या मुली आवडतात. साधारणपणे, मुलींच्या मनात असा समज असतो की बहुतेक मुलांना बारीक मुली आवडतात. पण हे खरे नाही. बारीक आणि फिट मुलींपेक्षा मुलांना जाड किंवा थोड्या लठ्ठ मुली जास्त आवडतात.

नॅशनल ऑटोनॉमस युनिव्हर्सिटी ऑफ मेक्सिकोने केलेल्या एका सर्वेक्षणानुसार, बहुतेक भारतीय मुलांना बारीक मुलींपेक्षा थोड्या जाड आणि लठ्ठ मुली जास्त आवडतात. त्यांना संधी मिळाली तर ते बारीक मुलींऐवजी जाड मुलीला गर्लफ्रेंड किंवा जीवनसाथी बनवण्यास प्राधान्य देतात. जाड मुलींमध्ये असे काय खास असते, ज्यामुळे त्या मुलांना आवडतात? चला जाणून घेऊया.

सर्वेक्षणानुसार, बारीक मुलींपेक्षा जाड मुलींसोबत मुले १० पटीने जास्त आनंदी राहतात. कारण जाड मुली त्यांना खाण्यापिण्यावर जास्त बंधन घालत नाहीत. त्या मुलांना व्यायाम आणि जीमसाठी दबाव आणत नाहीत. मुलांना त्यांच्या मनाप्रमाणे आयुष्य जगता येते. बारीक मुलींपेक्षा जाड मुलींसोबत त्यांना जास्त स्वातंत्र्य मिळते.

बहुतेक जाड मुली आनंदी आणि सकारात्मक स्वभावाच्या असतात. त्यामुळे त्यांच्यासोबत राहून मुलांना निरोगी आणि ताजेतवाने वाटते. त्यांना जाड मुलींची सोबत आवडते. या मुलींना खूश करण्यासाठी जास्त प्रयत्न करावे लागत नाहीत. त्या मुलांकडून जास्त अपेक्षा ठेवत नाहीत. बारीक मुलींना मात्र मुलांकडून जास्त अपेक्षा असतात आणि त्या मुलांना त्यांच्या मनाप्रमाणे बदलण्याचा प्रयत्न करतात, ज्यामुळे मुले वैतागतात.

सर्वेक्षणानुसार, जाड गर्लफ्रेंड किंवा जोडीदार(partner) मनमोकळेपणाने बोलतात. त्या कोणत्याही गोष्टीबद्दल लवकर गंभीर होत नाहीत आणि मोठ्या गोष्टी सहजपणे सोडून देतात. त्यांचा हसरा स्वभाव मुलांना आवडतो. मुले त्यांच्यासोबत कोणतीही भीती न बाळगता सर्व गोष्टी शेअर करतात. बारीक मुलींसमोर मात्र त्यांना विचारपूर्वक वागावे लागते.

हेही वाचा :

भारताविरोधात भिडण्याआधीच पाकिस्तानला मोठा धक्का हुकमी एक्का स्पर्धेबाहेर

रात्री उशिरा झोपणे: आरोग्यासाठी धोक्याची घंटा

आधी नटापटा, मग झिंज्या; महिलांच्या हाणामारीचा VIDEO व्हायरल!