“बुमराहचा राग: कॉन्टासला नडल्यावर पुढच्या बॉलवर मॅचमध्ये वाद Video
सिडनीच्या मैदानावर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील ५ कसोटी (match)सामन्यांच्या मालिकेतील पाचवा कसोटी सामना सुरु आहे. या मालिकेत भारतीय संघ २-१ ने पिछाडीवर आहे. त्यामुळे हा सामना जिंकणं भारतीय संघासाठी अतिशय महत्वाचं असणार आहे.
या सामन्यातील (match)पहिल्या डावात फलंदाजी करताना भारतीय संघाचा डाव १८५ धावांवर आटोपला. दरम्यान या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या ऑस्ट्रेलियाला सुरुवातीलाच मोठा धक्का बसला.
Jasprit bumrah took wicket of usman khawaja भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना १८५ धावा केल्या. ऑस्ट्रेलियाला सुरुवातीचे काही षटक खेळण्याची संधी मिळाली. ऑस्ट्रेलियाकडून डावाची सुरुवात करण्यासाठी उस्मान ख्वाजा आणि सॅम कॉन्टास ही जोडी मैदानावर आली. ऑस्ट्रेलियाचा संघ विकेट वाचवण्याच्या प्रयन्यात होता. यादरम्यान कॉन्टास आणि बुमराह यांच्यात बाचाबाची झाली. त्यानंतर उस्मान ख्वाजा बाद होऊन माघारी परतला.
तर झाले असे की, भारतीय संघाकडून तिसरे षटक टाकण्यासाठी जसप्रीत बुमराह गोलंदाजीला आला. त्यावेळी उस्मान ख्वाजा स्ट्राईकवर होता. बुमराह गोलंदाजीसाठी तयार होता. मात्र उस्मान ख्वाजा स्ट्राईक घेताना मुद्दाम वेळ वाया घालवत होता.
बुमराह ३ वेळा रनअपवर आला, मात्र तरीही तो तयार नव्हता. त्यावेळी बुमराहने ख्वाजाला जाब विचारला. बुमराह आणि ख्वाजाच्या वादात कॉन्टासने उडी घेतली.
Agression at its best .
— KarNa (@vkpkrc) January 3, 2025
absolute Cinema Moment.
Jasprit Bhumrah
KCPD moment #Jaspritbumrah #BGT2024 #INDvsAUSTest #IndvsAus #ViratKohli #samkontas #KCPD pic.twitter.com/MBSDYA4y73
बुमराह आणि कॉन्टास बाचाबाची झाली, त्यावेळी अंपायरने हा वाद मिटवला. मात्र पुढच्याच चेंडूवर बुमराहने ख्वाजाला झेलबाद करत माघारी धाडलं. ख्वाजा बाद होताच बुमराहने आक्रमक सेलिब्रेशन करताना दिसून आला.
तो कॉन्टासच्या अंगावर धावून गेला. आता दुसऱ्या दिवशी बुमराह आणि कॉन्टास यांच्यात जोरदार लढत पाहायला मिळू शकते. १८५ धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाला ९ धावांवर पहिला धक्का बसला.
हेही वाचा :
PM मोदींनी जो बायडेन यांच्या पत्नीला दिला सर्वात महागडा हिरा
“इतिहासात पहिल्यांदाच: अंतराळातून मोबाईल कॉल, ISRO अमेरिकन सॅटेलाईट प्रक्षेपित करणार!
धक्कादायक! माजी सरपंचावर भर रस्त्यात प्राणघातक हल्ला;