दसऱ्याच्या मुहूर्तावर खरेदी करा BMW ची इलेक्ट्रिक स्कूटर

बीएमडब्ल्यू या नामांकित कंपनीची नवीन BMW CE 02 इलेक्ट्रिक स्कूटर(electric scooter) भारतीय बाजारपेठेत लाँच करण्यासाठी सज्ज झाली आहे. BMW ची ही नवीन स्कूटर 1 ऑक्टोबरला बाजारात दाखल होणार आहे. याआधी कंपनीने भारतीय बाजारात BMW CE 04 स्कुटर आणली होती. BMW CE 04 ही स्कुटर पूर्णपणे परदेशात तयार केलेली आहे. तर CE 02 कंपनीने तिची देशांतर्गत भागीदार कंपनी TVS च्या सहकार्याने विकसित केली आहे.

नवीन BMW CE 02 स्कूटर आणि मोटरसायकल दरम्यान इलेक्ट्रिक(electric scooter) पॉवरट्रेनसह उर्जा प्रदान करणार आहे. तसेच या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये फ्लॅट सीट देण्यात आली आहे. चंकी एलईडी हेडलॅम्पही लावले आहेत. कंपनीचे म्हणणे आहे की, स्कूटरच्या पुढील भागात प्रीमियम घटक म्हणून USD काटे वापरण्यात आले आहेत.

BMW CE 02 मध्ये शक्तिशाली PMS एअर-कूल्ड इलेक्ट्रिक मोटर आहे. या मोटरमध्ये बॅटरी पॅकचे दोन पर्याय उपलब्ध आहेत. या EV मध्ये स्थापित केलेला 11 kW चा बॅटरी पॅक 14.7 bhp ची शक्ती प्रदान करतो. या बॅटरी पॅकसह स्कूटरचा टॉप-स्पीड 95 किमी प्रतितास पर्यंत जातो. तसेच त्याच्या 4 kW बॅटरी पॅकसह, ते 5.3 bhp ची शक्ती प्रदान करते आणि या बॅटरी पॅकसह टॉप-स्पीड 45 किमी प्रतितास पर्यंत जाते.

जर्मन ऑटोमेकर BMW ने अद्याप CE 02 च्या किमतीबाबत कोणताही खुलासा केलेला नाही. पण या EV ची किंमत CE 04 पेक्षा खूपच कमी असू शकते. BMW CE 02 ची निर्मिती भारतात केली जाते, तर या स्कूटरची किंमत पाच लाख रुपयांच्या रेंजमध्ये येऊ शकते. तर BMW CE 04 भारतात 14.90 लाख रुपयांच्या किंमतीसह आणली आहे.

हेही वाचा :

नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये भारतीय अर्थव्यवस्थेला मिळणार चालना!

…लवकरच दाखल होणार हा आयपीओ, गुंतवणूकदारांना मोठी संधी

‘दिलबर, दिलबर…’ गाण्यावर कंबर लचकवत मुलाचा बेली डान्स Video