विद्यार्थिनीला स्वत:च्या केबिनमध्ये बोलवायचा अन् जवळीक साधून..; क्रीडा शिक्षकाचे घृणास्पद कृत्य
गोंदिया : गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत आहेत. त्यात महिलांवरील अत्याचाराच्या घटना लक्षणीय आहेत. असे असताना आता गोंदियात विनयभंगाचे प्रकरण समोर आले आहे. शारीरिक शिक्षणाच्या नावावर विद्यार्थिनींशी (student) जवळीक साधून त्यांचा तिरोडा येथील एका नामांकित शाळेतील क्रीडा शिक्षकाने विनयभंग केला.
सुनील आत्माराम शेंडे (52, रा. गांधी वॉर्ड, तिरोडा) असे त्या शिक्षकाचे नाव आहे. सुनील शेंडे हा तिरोडा शहरातील एका नामवंत शाळेत एनसीसी शिक्षक पदावर कार्यरत असून, दहाव्या वर्गातील 15 वर्षीय पीडित मुलीशी अश्लील चाळे करायचा. मुलगी शाळेत गेल्यावर आरोपी तिला आपल्या ऑफिसमध्ये बोलवायचा. गुरुवारी (दि. 16) सकाळी 8.30 वाजता पीडिता शाळेत गेली असता त्याने तिला आपल्या ऑफिसमध्ये बोलावून तिचा हात पकडला. त्यानंतर त्याच दिवशी सायंकाळी 5.30 वाजता ऑफिसमध्ये तिचा उजवा हात पकडला. त्याच्या हाताला झटका देत ती मुलगी ऑफिसबाहेर गेली.
संधी मिळेल त्या ठिकाणी तो तिला पकडून अश्लील चाळे करायचा. त्या 15 वर्षांच्या मुलीशी अश्लील चाळे केल्यानंतर या प्रकाराची वाच्यता कुणाकडे करू नकोस, घरच्यांना काही सांगू नकोस, अन्यथा याद राख. याचा भुर्दंड तुला सहन करावा लागेल, अशी धमकी देत असल्याचे मुलीने पोलिसांत दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. तो एनसीसीचा सराव करण्याच्या नावावर दर शनिवारी व रविवारी विद्यार्थ्यांना(student) बोलावत होता. या सरावाच्या नावावर आरोपी त्या विद्यार्थिनीशी अश्लील चाळे करायचा.
विनयभंग व अश्लील चाळे करण्यासाठी सुट्टीच्या दिवशीही एनसीसीचा सराव आयोजित करायचा. पीडित मुलीच्या तक्रारीवरून तिरोडा पोलिसांनी विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास महिला पोलिस उपनिरीक्षक दिव्या बरड करीत आहे.
सदर प्रकाराबाबत मुलीने घरी माहिती दिल्याचे समजताच त्याने पीडित विद्यार्थिनीचे घर गाठून माफी मागितली. परंतु पीडित विद्यार्थिनीच्या पालकांसह नागरिकांनी त्याला घराशेजारी चांगलाच चोप दिला. सोमवारी (दि. 20) नातेवाइक व नागरिकांनी शाळेत जाऊन त्या शिक्षकाला निलंबित करण्याची मागणी केली होती. अखेर शिक्षण संस्थेने त्याला निलंबित केले आहे. तसेच न्यायालयाने त्याचा अटकपूर्व जामीन मंजूर केल्याची माहिती आहे.
हेही वाचा :
सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण…
आज द्विपुष्कर योगासह जुळून आले अनेक मोठे शुभ योग; 3 राशींना लाभच लाभ
आता तुमचं WhatsApp अकाऊंट फेसबुक आणि इंस्टाग्रामसोबत करू शकता लिंक