‘या’ माजी खासदारावर गुन्हा दाखल; काय आहे प्रकरण?
पुणे : छत्रपती संभाजीनगर नावाच्या पाटीला काळे फासून विद्रुपीकरण केल्याप्रकरणी माजी खासदार(politics) व एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांच्यासह पदाधिकाऱ्यांवर कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी महेश पांडुरंग भोईवार (वय २८, रा. कोंढवा) यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार, इम्तियाज जलील यांच्यासह कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, २३ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता छत्रपती संभाजीनगर-जालना महामार्गावरील देवळवाडी फाटा भागात ही घटना घडली. इम्तियाज जलील आणि कार्यकर्त्यांनी फेरी काढली होती. त्यावेळी समाजात तेढ निर्माण करण्यासाठी घोषणा देण्यात आल्या.
छत्रपती संभाजीनगर-जालना महामार्गावरील नामफलकाला काळे(politics) फासण्यात आले. याबाबत भोईवार यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. पोलीस उपायुक्त आर. राजा यांनी तक्रार अर्जाची पडताळणी केली. त्यानंतर संबंधित गुन्हा छत्रपती संभाजीनगर पोलिसांकडे तपासासाठी वर्ग करण्यात आला आहे.
हेही वाचा :
अंकिता लोखंडे देणार गूड न्यूज? प्रेग्नेंट असल्याची चर्चा
अनिल अंबानींचे पुन्हा ‘अच्छे दिन’ येणार! ‘या’ देशासोबत केला करार
चाहत्यांना धक्का! प्रेक्षकांची लाडकी कोकण हार्टेड गर्ल ‘बिग बॉस’मधून आउट?