कॅश डिपॉजिट कराचीय, पण बँकेच्या गर्दीचं टेन्शन आलंय? UPI मिटवेल चिंता,

भारतात दर तासाला २.५ कोटींहून अधिक UPI व्यवहार होतात. युपीआयच्या सर्व्हिसमुळे(crowd) अनेक लोकांनी रोख रक्कम आपल्याकडे ठेवणं बंद केलंय. पेटीएम, जीपे, फोनपे सारखी अ‍ॅप्स यूपीआय सेवा प्रदान करतात. या अ‍ॅप्समुळे लोकांसाठी दैनंदिन पेमेंट करण्याची प्रक्रिया खूप सोपी झालीय. जर तुम्ही एखाद्या व्यापाऱ्याला पेमेंट करण्यासाठी किंवा पैसे ट्रान्सफर करण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी UPI वापरत असाल तर आताच तुमची सवय बदला.

कारण UPI केवळ ऑनलाइन पेमेंटमध्येच मदत करत नाही तर एखाद्याच्या खात्यात पैसे जमा करण्यास देखील मदत करते. (crowd) नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया नुसार, UPI द्वारे पैसे काढण्याची ही सुविधा बँका आणि व्हाईट लेबल ऑपरेटर्स च्या एटीएमवर उपलब्ध असेल. कॅश रिसायकलर मशीनद्वारे रोख रक्कम जमा करता येते. एनपीसीआयनुसार, बँका हळूहळू या सुविधा सुरू करतील तसा ग्राहकांना याचा लाभ घेता येईल.

यूपीआय-आधारित कॅश डिपॉझिट सेवेमुळे ग्राहकांचा वेळ वाचेल. त्यांना बँकेत पैसे जमा करण्यासाठी रांगेत उभे राहावे लागणार नाही.(crowd) ग्राहक कोणत्याही एटीएममध्ये जाऊन कधीही रोख रक्कम जमा करू शकतील. यासाठी एटीएम कार्डची आवश्यकता नसणार आहे.

तुम्हाला UPI व्यवहारांना सपोर्ट करणाऱ्या कॅश डिपॉझिट मशीन मध्ये ‘UPI कॅश डिपॉझिट’ हा पर्याय निवडावा लागेल. त्यानंतर स्क्रीनवर एक QR कोड दिसेल. ग्राहकांना त्यांच्या फोनवर UPI अॅप उघडावे लागेल आणि स्क्रीनवर दिसणारा QR कोड स्कॅन करावा लागेल. त्यानंतर, पैसे जमा करण्यासाठी, नोटा मशीनच्या प्लेटमध्ये ठेवाव्या लागतील. सीडीएमने शोधलेली ठेव रक्कम यूपीआय अॅपवर दिसेल. याची पडताळणी करावी लागेल.आता, UPI-लिंक्ड खात्यांच्या यादीतून, तुम्हाला ज्या बँक खात्यात रोख रक्कम जमा करायची आहे ते खाते निवडावे लागेल. त्यानंतर, तुम्हाला UPI पिन टाकावा लागेल. त्यानंतर, रोख रक्कम जमा होईल आणि तुम्हाला रक्कम जमा झाल्याची पावती मिळेल.

हेही वाचा :