नववर्षाचं खास सेलिब्रेशन पार्टनरसह: भारतातील टॉप रोमँटिक ठिकाणं!
2024 चे वर्ष संपत आले असून प्रत्येक जण 2025 ची वाट बघत आहे. यासाठी अनेकांची प्लानिंग सुरु झाली आहे. बरेच लोक नवीन वर्षासाठी बाहेर जातात. प्रत्येकाला आपले न्यू इयर सेलिब्रेशन खास बनवायचे असते. प्रत्येकाला हा क्षण आपल्या जवळच्या (partner)व्यक्तींसोबत साजरा करायचा असतो.
तुम्हीही थर्टी फर्स्ट आणि न्यू इयर सेलिब्रेशनसाठी आपल्या (partner)पार्टनर सोबत बाहेर जाण्याचा प्लान करत असाल तर भारतातील या ठिकांबद्दल जाणून घ्या.जेणेकरुन आपण आपल्या जोडीदारासह काही चांगला वेळ घालवू शकता.
पुद्दुचेरी
नवीन वर्षात तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत पुद्दुचेरीला भेट देण्याचा प्लान करू शकता. येथे तुम्ही अनेक हेरिटेज साइट्स एक्सप्लोर करू शकता. हा प्रवास तुमच्यासाठी खूप अविस्मरणीय राहील. पुद्दुचेरी मध्ये तुम्हाला फ्रेंच संस्कृती पाहण्यासाठी आणि अनुभवण्यासाठी मिळेल. तसेच येथील शांत वातावरण आणि निळे पाणी असलेल्या समुद्रकिनाऱ्यांवर, तुम्हाला तुमच्या जोडीदारासह चांगला वेळ घालावता येईल.
उदयपूर
नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनसाठी तुम्ही उदयपूरला जाऊ शकता. हिवाळ्यातल्या गुलाबी थंडीत राजस्थानला तुम्ही भेट देऊ शकता. तुम्हाला येथे सुंदर दृश्ये पाहायला मिळतील. येथे असलेले सरोवरही तितकेच प्रसिद्ध आहे. तसेच येथील पॅलेसला तुम्हा भेट देऊ शकता. ही सहल तुमच्यासाठी खूप अविस्मरणीय देखील असू शकते. तसेच तुम्ही येथे रोमँटिक लंच किंवा डिनर डेटचे प्लान करु शकता.
मनाली
डिसेंबरच्या या थंड वातावरणात तुम्ही हिमाचललाही भेट देऊ शकता. यासाठी तुम्ही शिमला, कसोल आणि मनालीमध्ये फिरू शकता. या ऋतूत तिथे जाण्याचा आनंद वेगळाच आहे. येथे कपल्ससाठी तुम्हाला कॅम्पिंग, ट्रेकिंगचे पॅकजेस सुद्धा असतात. या सहलीत तुम्हाला पॅराग्लायडिंग, स्केटिंग आणि पॅराशूटिंगचाही आनंद घेता येणार आहे. न्यू इयर निमित्त मनालीमध्ये खास पार्ट्यांचे देखील आयोजन केले जाते. शॅापिंगसाठी तुम्ही मॅाल रोडला भेट देऊ शकता.
केरळ
नवीन वर्षाच्या निमित्ताने तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत केरळला जाऊ शकता. येथील नैसर्गिक दृश्ये, नारळाची उंच झाडे, आणि शांत वातावरणात तुम्हाला शांतता मिळेल. जर तुम्हाला तुमच्या जोडीदारासोबत नवीन वर्ष शांततेत साजरे करायचे असेल तर तुम्ही केरळला जाण्याचा प्लान करु शकता. याशिवाय तुम्ही मुन्नार हिल स्टेशनला भेट देण्यासाठी देखील जाऊ शकता. ही सहल तुमच्यासाठी खूप रोमँटिक असेल.
हेही वाचा :
वर्षाच्या शेवटी Jio चा युजर्सना पुन्हा झटका; या दोन लोकप्रिय प्लॅन्सची व्हॅलिडीटी केली कमी
“सिराजच्या विकेटवरून पॅट कमिन्सचा अंपायरशी वाद, मैदानात रंगला मोठा ड्रामा!
मंत्री हसन मुश्रीफ यांचं धनंजय मुंडेंबाबत मोठं विधान; म्हणाले, …तोपर्यंत राजीनामा देण्याची आवश्यकता