मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ‘या’ दिवशी दाखल करणार उमेदवारी अर्ज!
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक अवघ्या एका महिन्यावर आली आहे. त्यामुळे राजकीय नेतेमंडळी आपल्या पक्षाचा उमेदवार जाहीर करण्यावर भर देत आहे. काल भाजपने 99 उमेदवारणाची यादी देखील जाहीर केली आहे. अशातच आता राज्याच्या राजकारणातील आणखी एक मोठी बातमी समोर आली आहे. मुख्यमंत्री(Minister) एकनाथ शिंदे यांनी विधानसभा उमेदवारी अर्ज भरण्याची तारीख देखील निश्चित केली आहे.
विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय क्षेत्रात अनके घडामोडी घडत आहेत. अशातच काल भाजपने एक पाऊल पुढे टाकत विधानसभा उमेदवारांची यादी देखील जाहीर केली आहे. भाजपच्या पहिल्या यादीमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं देखील नाव जाहीर करण्यात आलं आहे.
मात्र आता महायुतीतील शिवसेना शिंदे गट देखील विधानसभेची पहिली यादी जाहीर करणार आहे. त्यापूर्वीच आता मुख्यमंत्री(Minister) एकनाथ शिंदे यांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची तारीख जाहीर केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे येत्या 24 ॲाक्टोबरला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. तर ठाणे शहरातील कोपरी-पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघातून ते उमेदवारीसाठी अर्ज दाखल करणार आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी एक शक्तीप्रदर्शन देखील करणार आहेत. यावेळी मोठ्या प्रमाणात शिंदे गटाचे समर्थक ठाण्यातील रस्त्यावर एकत्रित गोळा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे वाहतूक व्यवस्थेत देखील बदल केला जाणार असल्याचं सांगितलं जात आहे.
दरम्यान दुसरीकडे माणसे अध्यक्ष राज ठाकरे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणिएकनाथ एकनाथ शिंदेंची बैठक पार पडली आहे. या बैठकीत महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीवर चर्चा झाल्याचं सांगितलं जात आहे.
हेही वाचा :
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा ट्विस्ट आणणार तिसरी आघाडी
लेकाला उमेदवारी मिळवण्यासाठी खासदार धनंजय महाडिकांची थेट मुख्यमंत्री शिंदेंची भेट!
लाडकी बहीण योजना बंद? आदिती तटकरेंनी सांगितलं यामागचं खरं कारण