मुख्यमंत्री शिंदे यांची मोठी घोषणा: ‘लाडकी बहीण’ योजनेच्या अंतर्गत मदत दुप्पट, महायुतीला साथ दिल्यास तीन हजार रुपये प्रति महिना

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आगामी विधानसभा निवडणुकीत (election)महायुतीला समर्थन दिल्यास ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण’ योजनेची मदत दरमहा दीड हजार रुपयांवरून तीन हजार रुपये केली जाईल, अशी मोठी घोषणा केली आहे.

बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल येथे आयोजित वचनपूर्ती कार्यक्रमात मुख्यमंत्री शिंदे बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, महिला व बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, काँग्रेसच्या सरकारने ५० ते ६० वर्षे सर्वसामान्य बहिणींसाठी काहीही केलं नाही. मोदी सरकारच्या निर्णयामुळे ‘लाडकी बहीण’ योजनेची सर्व रक्कम महिलांच्या खात्यात जमा होत आहे. विरोधकांनी या योजनेवर आरोप केले आहेत, पण आता बहिणींना कोणाच्या समोर हात पसरावा लागणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

योजनेच्या अंतर्गत सप्टेंबरपर्यंत आलेल्या अर्जांची छाननी पूर्ण करून दोन महिन्यांची तीन हजार रुपयांची मदत देण्यात येईल, अशी माहिती शिंदे यांनी दिली. या योजनेला विरोध करणाऱ्यांना “सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेल्यांना पंधराशे रुपयांचे मोल काय कळणार?” असा टोलाही त्यांनी लगावला.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीच्या सरकारवर आरोप करताना म्हटले की, महाविकास आघाडीच्या सत्तेत आल्यानंतर त्यांच्या सरकारने अनेक योजनांचे बंद केले आहे.

या घोषणेसह, शिंदे सरकारने आगामी विधानसभा निवडणुकीत ‘लाडकी बहीण’ योजनेला जास्तीत जास्त लाभार्थी मिळवून देण्याचे आश्वासन दिले आहे.

हेही वाचा :

उपवासाचे महत्त्व: शारीरिक व मानसिक आरोग्याचे लाभ

घरीच बनवा सोप्या पद्धतीने काजू कतली, जाणून घ्या रेसिपी

“मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा हडपसर दौरा: ” माझी लाडकी बहीण ” योजनेचा शुभारंभ”