मुलं रात्री 2 वाजता उठतात आणि आई-वडिलांना…कपिल शर्माचं ‘ते’ विधान चर्चेत!

या शोमध्ये रणवीर अल्लाहबादिया यांनी केलेल्या वादग्रस्त विधानांवरून मोठा गदारोळ सुरू असताना(news), आता कॉमेडियन कपिल शर्मा यांचा एक जुना व्हिडिओ पुन्हा व्हायरल झाला आहे. या क्लिपमध्ये कपिलने क्रिकेट आणि मुलांच्या सवयींवर केलेला विनोद सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.

या व्हिडिओमध्ये कपिल शर्मा ‘कॉमेडी नाइट्स विथ कपिल’ या लोकप्रिय शोमध्ये मुलांच्या क्रिकेटविषयीच्या उत्साहावर टिप्पणी करताना दिसतो(news). तो म्हणतो की, “मुलं सकाळी 4 वाजता क्रिकेट मॅच पाहण्यासाठी उठतात, पण अभ्यासासाठी कधीही लवकर उठत नाहीत.”

यानंतर तो गंमतीत पुढे म्हणतो, “काही मुलं रात्री 2 वाजताही उठतात, पण त्यांच्या आई-वडिलांना एका वेगळ्या खेळात व्यस्त पाहतात आणि परत झोपून जातात.” हा जोक करताना त्याने ‘माँ-बाप की कबड्डी’ असा शब्दप्रयोग केला, जो आता पुन्हा चर्चेत आला आहे.

रणवीर अल्लाहबादिया यांच्या वादग्रस्त विधानांमुळे सोशल मीडियावर तुफान प्रतिक्रिया उमटत आहेत. या पार्श्वभूमीवर कपिल शर्मा यांचा हा मजेदार जोकही चर्चेत आला आहे. कपिलने वर्षांपूर्वी केलेला हा विनोद काहींना हलका-फुलका वाटत असला, तरी काहींनी त्यावर नाराजीही व्यक्त केली आहे.

दरम्यान, रणवीर अल्लाहबादिया यांनी आपल्या विधानावर माफी मागितली आहे आणि राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने यूट्यूबला पत्र लिहून त्यांच्या विधानांविषयी नाराजी दर्शवली आहे.

हेही वाचा :

पेट्रोल-डिझेलचे नवे दर लागू…

IPL 2025 आधीच RCB चा विराटला मोठा धक्का! 

‘फार्मर’ आयडी शेतकऱ्यांसाठी फायदेशीर, मिळणार 5 मोफत फायदे