प्रजासत्ताक दिनी शाळेतील नाटकात मुलांना खऱ्या फाशीवर चढवले, पाहून शिक्षकही हादरले; Video Viral
सोशल मीडियावर दररोज अनेक व्हिडिओ दिसतात, त्यातील काही इतके व्हायरल होतात की ते चर्चेचा विषय बनतात. असाच एक व्हिडिओ सध्या खूप व्हायरल होत आहे. ज्यामध्ये प्रजासत्ताक दिनानिमित्त (Republic Day)आयोजित शालेय कार्यक्रमात तीन लहान मुले अक्षरशः फाशीच्या दोरखंडात लटकताना दिसत आहेत. या कार्यक्रमाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच लोकांमध्ये आता याची चर्चा होऊ लागली आहे. यातील दृश्ये अनेकांना आता हादरवत आहे. दरम्यान यात नक्की काय घडले ते सविस्तर जाणून घेऊया.
व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये प्रजासत्ताक दिनानिमित्त(Republic Day) आयोजित करण्यात आलेल्या नाटकातील काही दृश्ये दिसून येत आहेत. यात तीन मुले भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांच्या भूमिका साकारताना दिसत आहेत. सर्व मुले कैद्यांच्या पोशाखात आहेत. त्यांचे डोके काळ्या कापडाने झाकलेले आहे. व्हिडिओमध्ये तिन्ही मुले रश्शीवर लटकताना दिसत आहेत.
तिघांच्या गळ्यात गळफास बसवल्याने दिसत आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर प्रथमदर्शनी असे दिसते की, मुलांनी गळफास घेऊन आपला जीव गमावला आहे. हे पाहून पायऱ्यांवरील एक व्यक्ती धावत पळत स्टेजवर येतो. पण जेव्हा त्याला कळते की ही मुले जिवंत आहेत आणि हा सगळा नाटकाचा भाग आहे. मग तो तिथून परत निघून येतो.
हा व्हिडीओ कधी आणि कुठचा आहे याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. मात्र हा व्हिडीओ 26 जानेवारीच्या प्रजासत्ताक दिनाचा असल्याचे मानले जात आहे. त्याचबरोबर या व्हिडिओमुळे मुलांच्या सुरक्षेबाबत सोशल मीडिया यूजर्समध्ये वादाला तोंड फुटले आहे. जिथे कार्यक्रमाच्या निमित्ताने कुणाचा जीव धोक्यात घालणे चुकीचे असल्याचे अनेकांचे म्हणणे आहे. या घटनेची चौकशी करून त्याची दखल घेणे आवश्यक आहे. त्याचबरोबर इतरही अनेकांनी शाळा प्रशासनावर प्रश्न उपस्थित केले.
प्रोग्राम के लिए किसी की जिंदगी को यूं खतरे में डालना गलत है।
— अश्विनी सोनी اشونی سونی (@Ramraajya) January 28, 2025
सोशलमीडिया पर वीडियो वायरल है।
कबकी और कहाँ की घटना इसकी जाँच कर इसका संज्ञान लिया जाना आवश्यक है। pic.twitter.com/ylTbrxq04s
या संपूर्ण प्रकारचा व्हिडिओ @Ramraajya नावाच्या एक्स अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये, एखाद्या कार्यक्रमासाठी कुणाचा जीव धोक्यात घालणे चुकीचे आहे, हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, घटना केव्हा व कुठे घडली याचा तपास करून त्याची दखल घेणे आवश्यक आहे’ असे लिहिण्यात आले आहे.
व्हिडिओला आतापर्यंत 1 मिलियनहून अधिक लोकांनी पाहिले असून अनेकांनी यावर आपल्या प्रतिक्रिया कमेंट्समध्ये शेअर केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “या प्रकारच्या शाळा आणि शिक्षकांवर बंदी घातली पाहिजे” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “दोरी तुटली तर गळा दाबला जाईल”.
हेही वाचा :
आजपासून सुरू होणार संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन
तिसऱ्यांदा मोडलं राखी सावंतचं लग्न, प्रपोज करणाऱ्या अभिनेत्याचा लग्नाला नकार
सुनीता विल्यम्स यांचा 15 दिवसात दुसऱ्यांदा स्पेसवॉक, वयाच्या 59व्या वर्षी अंतराळात केला भीम पराक्रम