चिन टपाक डम डम : छोटा भीममधून आलेला डायलॉग सोशल मीडियावर का व्हायरल होतोय?
पुणे : सोशल मीडियावर (social media)सध्या ‘चिन टपाक डम डम’ हा डायलॉग तुफान व्हायरल होत आहे. इंस्टाग्राम रील्समध्ये तर हा डायलॉग अनेक व्हिडिओंमध्ये वापरला जात आहे. पण हा डायलॉग आला तरी कुठून आणि त्याचा अर्थ काय, हे जाणून घ्यायची उत्सुकता तुम्हालाही असेल.
हा डायलॉग छोटा भीम या लोकप्रिय कार्टून शोमधील एका एपिसोडमधील आहे. या एपिसोडमध्ये खलनायक टाकिया ‘चिन टपाक डम डम’ असे म्हणतो आणि वाळूच्या सैनिकांची फौज तयार करतो. हा डायलॉग आता सोशल मीडियावर मिम्स आणि रील्समध्ये वापरला जात आहे.
हा डायलॉग व्हायरल होण्यामागचे कारण काय?
- आकर्षक शब्द: ‘चिन टपाक डम डम’ हे शब्द ऐकायला आकर्षक आहेत आणि सहज लक्षात राहतात.
- मिम्स आणि रील्स: ‘चिन टपाक डम डम’ हा डायलॉग मिम्स आणि रील्समध्ये विनोदी पद्धतीने वापरला जात आहे, ज्यामुळे तो अधिक लोकप्रिय होत आहे.
- छोटा भीमची लोकप्रियता: छोटा भीम हा भारतातील सर्वाधिक लोकप्रिय कार्टून शो आहे. त्यामुळे या शोमधील डायलॉग सोशल मीडियावर व्हायरल होणे स्वाभाविक आहे.
‘चिन टपाक डम डम’ हा डायलॉग सध्या सोशल मीडियावर ट्रेंडिंग आहे. या डायलॉगचा वापर करून अनेक क्रिएटर्स आपली कला दाखवत आहेत.
हेही वाचा:
लहान मुलांच्या दुधात साखर? तज्ज्ञांचा सल्ला : टाळा गोडवा, वाढवा आरोग्य!
राजघराण्यातील ‘या’ अभिनेत्रीचा MMS लीक; गंभीर आरोप…
दिपीकाने दिला बाळाला जन्म?; सोशल मीडियावर फोटो होतोय व्हायरल