नागरिकांनो लक्ष द्या! १ जुलैपासून होणार ६ मोठे बदल; तुमच्या खिशाला लागणार कात्री

नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. रेल्वे तिकिटात १ जुलैपासून भाढेवाढ होणार आहे.(Railway ) तसेच ऑनलाईन व्यवहार, क्रेडिट कार्ड पेमेंटमध्ये सुद्धा महत्त्वाचे बदल करण्यात येणार आहे. या बदलांचा फटका सर्वसामान्यांना बसणार आहे .प्रत्येक महिन्याला, अनेक आर्थिक बदल लागू होतात जे सर्वसामान्य कुटुंबांच्या वैयक्तिक आर्थिक स्थितीवर परिणाम करतात. जुलै महिना आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीची सुरुवात करतो. या १ जुलै २०२५ पासून भारतीय रेल्वेच्या नवीन तत्काळ तिकिट नियमांपासून ते जीएसटी भरण्यातील बदलांपर्यंत अनेक बदल होणार आहेत.

‘हे’ महत्त्वाचे बदल होणार
१. रेल्वे भाडेवाढ
रस्तेवाहतुकीच्या तुलनेने रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या जास्त आहे. अशातच आता १ जुलै पासून सुरु होणाऱ्या आर्थिक वर्षात रेल्वेच्या तिकीट दरात वाढ होणार आहे. तसेच लांब पल्ल्यांच्या गाड्यांचेही तिकिटात वाढ होणार आहे.

२. एटीएम शुल्क वाढणार
जर तुम्ही आयसीआयसीआय एटीएम मशीन वापरून पैसे काढत असाल तर ते तुम्हाला जास्त महागात पडू शकते. (Railway ) १ जुलैपासून, जर तुम्ही आयसीआयसीआय एटीएम मधून मर्यादेपेक्षा जास्त पैसे काढले तर तुम्हाला प्रति व्यवहार २३ रुपये शुल्क भरावे लागेल. या एटीएम मध्ये तुम्हाला ५ व्यवहार मोफत मिळतील, म्हणजेच यामध्ये तुम्हाला कोणतेही शुल्क द्यावे लागणार नाही. तथापि, महानगरांमध्ये ही मर्यादा ३ व्यवहारांची आहे.

३. एचडीएफसी क्रेडिट कार्ड महागणार
जर तुम्ही एचडीएफसी क्रेडिट कार्ड वापरत असाल तर ते वापरणे तुम्हाला महागात पडणार आहे. जर तुम्ही पेटीएम , फोने पे इत्यादी थर्ड पार्टी अ‍ॅप्सद्वारे एचडीएफसी क्रेडिट कार्ड पेमेंट केले तर तुम्हाला १% शुल्क भरावे लागेल. याशिवाय तुम्ही युटिलिटी बिल भरताना तुम्हाला अतिरिक्त शुल्क भरावे लागेल.

४. एलपीजी सिलेंडरच्या किमतीत बदल
दर महिन्याच्या पहिल्या तारखेला, गॅस एजन्सी कंपनी एलपीजी सिलिंडरच्या किमती सुधारित करते. यामध्ये घरगुती आणि व्यावसायिक सिलिंडरचा समावेश आहे.

५. क्रेडिट कार्ड बिल पेमेंटमध्ये वाढ
आरबीआयने क्रेडिट कार्ड बिल पेमेंटचे नियम बदलले आहेत. हे बदल १ जुलैपासून लागू होणार आहेत.(Railway ) नवीन नियमांनुसार आता सर्व क्रेडिट कार्ड बिल फक्त भारत बिल पेमेंट सिस्टम वरून भरता येतील. याचा परिणाम फोन पे, क्रेडिट सारख्या प्लॅटफॉर्मवर होणार आहे.

६. पॅन, आधारकार्ड लिंक अनिवार्य
आता आधारकार्ड शिवाय पॅनकार्ड मिळणार नाही. कारण १ जुलैपासून पॅन कार्डमध्ये मोठा बदल होणार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, आता पॅन कार्ड बनवण्यासाठी आधार कार्ड असणे अनिवार्य असेल. दुसरीकडे, जर तुमचे पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक केलेले नसेल, तर तुम्ही ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक करू शकता.

हेही वाचा :