सोन्याच्या दरात घट कायम! जाणून घ्या आजचा भाव

सोन्याच्या किमतीत गेल्या काही दिवसांपासून सतत बदल होत आहेत. (changing) १० दिवसांपूर्वी, म्हणजेच ६ मे २०२५ रोजी, २२ कॅरेट सोन्याचा भाव ९० हजार २५० रुपये प्रति १० ग्रॅम होता, तर २४ कॅरेट सोन्याचा भाव ९८ हजार ४०७ रुपये प्रति १० ग्रॅम होता. त्यानंतर दोन दिवस किमती वाढल्या आणि ८ मे २०२५ रोजी २४ कॅरेट सोन्याचा भाव ९९ हजार ६०० रुपये प्रति १० ग्रॅमवर पोहोचला. मात्र, १२ मे २०२५ रोजी सोन्याच्या किमतीत मोठी घसरण झाली आणि सोने ३ हजार २२० रुपयांनी स्वस्त झाले. या दिवशी २४ कॅरेट सोन्याचा भाव ९५ हजार ४६० रुपये प्रति १० ग्रॅम होता. त्यानंतर, काल म्हणजेच १४ मे २०२५ रोजी देखील किमतीत ५४० रुपयांची घट झाली.

आज, १५ मे २०२५ रोजी देखील सोन्याच्या दरात घसरण दिसून येत आहे. आज १८ कॅरेट, २२ कॅरेट आणि २४ कॅरेट सोन्याचे भाव काय आहेत, याचा आढावा घेऊया.मुंबई, पुणे, नागपूर, ठाणे, कोल्हापूर, जळगाव: १८ कॅरेट सोने ७२ हजार ४० रुपये प्रति १० ग्रॅम, २४ कॅरेट सोने ९६ हजार ६० रुपये प्रति १० ग्रॅम आणि २२ कॅरेट सोने ८८ हजार ५० रुपये प्रति १० ग्रॅम इतके होते.नाशिक, लातूर, वसई विरार, भिवंडी: (changing)१८ कॅरेट सोने ७२ हजार ७० रुपये प्रति १० ग्रॅम, २४ कॅरेट सोने ९६ हजार ९० रुपये प्रति १० ग्रॅम आणि २२ कॅरेट सोने ८८ हजार ८० रुपये प्रति १० ग्रॅम इतके होते.

मुंबई, पुणे, नागपूर, ठाणे, कोल्हापूर, जळगाव: आज १८ कॅरेट सोन्याचा भाव ७२ हजार ३० रुपये प्रति १० ग्रॅम आहे. २४ कॅरेट सोन्याचा भाव ९६ हजार ५० रुपये प्रति १० ग्रॅम आणि २२ कॅरेट सोन्याचा भाव ८८ हजार ४० रुपये प्रति १० ग्रॅम आहे.नाशिक, लातूर, वसई विरार, भिवंडी: आज १८ कॅरेट सोन्याचा भाव ७२ हजार ६० रुपये प्रति १० ग्रॅम आहे. २४ कॅरेट सोन्याचा भाव ९६ हजार ८० रुपये प्रति १० ग्रॅम आणि २२ कॅरेट सोन्याचा भाव ८८ हजार ७० रुपये प्रति १० ग्रॅम आहे(changing)या आकडेवारीवरून स्पष्ट होते की, सोन्याच्या दरात घसरण सुरूच आहे, ज्यामुळे सोने खरेदीदारांना काहीसा दिलासा मिळू शकतो. मात्र, जागतिक आणि स्थानिक स्तरावरील आर्थिक घडामोडींच्या पार्श्वभूमीवर सोन्याच्या किमतीत आणखी बदल होण्याची शक्यता आहे.

हेही वाचा :

कामाच्या वेळेत गर्लफ्रेंडसोबत सेक्स करताना मृत्यू; न्यायालयाने दिला मोठा निर्णय

‘त्या’ प्रकरणात कुख्यात गुंड अरुण गवळी निर्दोष, न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय

रॉटविलर कुत्रा कोणाचाच नसतो, चार महिन्याच्या मुलीसोबत जे केलं, ते ऐकून थरकाप उडेल