नागरिकांना पुन्हा लावावे लागणार मास्क, कारण…

हिवाळ्यामध्ये अनेक आजार डोकं वर काढत आहेत. अशातच आता मुंबईमध्ये सातत्याने हवामानात बदल होत असल्याने प्रदूषण देखील वाढत आहे. दरम्यान गेल्या आठवड्यात दिवाळी सण थाटामाटात पार पडला आहे. त्यामुळे प्रदूषणामध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे आता मुंबईमधील हवेची गुणवत्ता देखील खालावली आहे. मात्र आता वाढत्या प्रदूषणामुळे हवामान तज्ज्ञांनी मास्क(face mask) वापरण्याचा सल्ला दिला आहे.

हवामान तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईमधील बदलत्या वातावरणामुळे प्रदूषणामध्ये देखील वाढ होत आहे. कारण गेल्या काही दिवसांपासून मुंबईत वाऱ्याचा वेग कमी झाल्याने वाऱ्याची गुणवत्ता देखील कमी झाली आहे. त्यामुळे हवेतील प्रदूषणाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढू लागले आहे. मात्र त्यामुळे आता मुंबईतील रुग्णालयांमध्ये श्वसनाच्या रुग्णांमध्ये वाढ होत असल्याचं दिसून येत आहे.

मुंबईसह आजूबाजूच्या शहरांत वाऱ्याचा वेग हा झपाट्याने कमी झाला आहे. त्यामुळे आता हवेतील प्रदूषणाचे प्रमाण झपाट्याने वाढू लागले आहे. अशातच आता नोव्हेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात मुंबईची हवा देखील प्रदूषित झाली आहे. त्यामुळे सर्वत्र धुरकट वातावरण झाल आहे. तसेच यामुळे दृष्यमान देखील कमी झाली आहे. मुंबईतील या प्रदूषणामुळे आणि खराब वाऱ्यामुळे सर्वत्र धुक्याची चादर पसरल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

हवामान तज्ज्ञांने दिलेल्या माहितीनुसार, दिवाळीमध्ये फोडलेल्या फटाक्यांमुळे प्रदूषणात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे आता मुंबईतील प्रदूषित हवेमुळे फुफ्फुसाच्या संसर्गाच्या रुग्णांमध्ये 20 टक्क्यांनी वाढ देखील झाली आहे. त्यामुळे डॉक्टरांनी मुंबईमधील नागरिकांना काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे. तसेच घराबाहेर पडताना मास्क(face mask) लावण्याचा सल्ला देखील डॉक्टरांनी दिला आहे.

सध्या मुंबईमधील वायू प्रदूषणात वाढ झाल्याने महापालिका प्रशासन देखील हैराण झाले आहे. तसेच सध्या मुंबईत हवेचा गुणवत्ता निर्देशांक हा 129 वर आला आहे. त्यामुळे ही अत्यंत खराब श्रेणी आहे. मॅटर आता यावर तोडगा काढण्याचे शर्थीचे प्रयत्न देखील मुंबई महापालिकेकडून केले जात आहे.

हेही वाचा :

निवडणुकीच्या धामधुमीत महाराष्ट्रात 280 कोटीचं घबाड पकडलं

‘या’ तारखेनंतर राज्यात थंडीचा कडाका वाढणार

ऐन निवडणुकीच्या रिंगणात शिंदे गटाला मोठा धक्का! पदाधिकाऱ्यांचा सामूहिक राजीनामा