Sangali : आर. आर. पाटलांनी माझा केसाने गळा कापला; अजित पवारांचे गंभीर आरोप

सांगली: गेल्या काही वर्षांत सिंचन घोटाळ्यावरून विद्यमान उपमुख्यमंत्री (current political news)अजित पवार यांच्यावर अनेकदा गंभीर आरोप झाले. चौकशीचा ससेमिराही त्यांच्या मागे लागला, अनेकदा अडचणीतही आले. पण अजित पवारांनी या सिंचन घोटाळ्याचा उल्लेख करत आता दिवंगत माजी गृहमंत्री आरा. आर. पाटील यांच्यावरच गंभीर आरोप केले आहेत. सांगलीच्या तासगावमध्ये बोलताना अजित पवारांनी सिंचन घोटाळ्यासंबंधीच्या आरोपांवर भाष्य केलं आहे. आर. आर. पाटील यांनी केसाने माझा गळा कापला. असा आरोप अजित पवार यांनी केला आहे.

अजित पवार गटाचे उमेदवार संजय काका पाटील(current political news) यांच्यासाठी आज अजित पवार यांनी तासगावमध्ये सभा घेतली. या सभेत बोलताना अजित पवारांनी दिवंगत आर. आर. पाटील यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.तासगावच्या सभेत बोलताना अजित पवार म्हणाले, ” सिंचन घोटाळ्यासंबंधी माझ्यावर 70 हजार कोटी रुपयांचे आरोप झाले.

आरोप झाल्यावर कारवाई करण्यासाठी तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्याकडे फाईल गेली. त्यावेळी आर. आर पाटील यांनी माझी खुली चौकशी करण्याचे आदेश देत फाईल सही केली. पण त्यानंतर सरकार गेलं, राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली. पण राज्यपालांनी माझ्या त्या फाईलवर सही केली नाही. 2014 मध्ये भाजप-शिवसेना युतीचे सरकार आले आणि देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले. त्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री म्हणून माझ्यावर कारवाई करण्यासाठी फाईलवर सही केली.

काही दिवसांपूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी मला त्यांच्या बंगल्यावर बोलवून आर. आर. पाटील यांनीच तुमच्या चौकशीसाठी आदेश दिले, आणि फाईलवर सही केल्याचे दाखवले. ज्यांच्यावर एवढा विश्वास ठेवला, सहकार्य केलं. त्याच आर. आर. पाटील यांनी माझा केसाने गळा कापला होता, असा गंभीर आरोप अजित पवार यांनी केला.

धक्कादायक म्हणजे मुंबईत दहशतवादी हल्ले झाले. त्यावरही “बडे बडे शहरो मे छोटे-छोटे हातसे होते रहते है” असही त्यांनी म्हटलं होतं. आर. आर. पाटील यांना कोणीतरी राजीनाामा द्यायला सांगितला. तर त्यांनी राजीनामा देऊन थेट अंजनी गाठले. त्यांच्या राजीनाम्याची मला कल्पनाच दिली नाही. कितीदातरी त्यांना तंबाखू न खाण्याचा सल्ला दिला पण माझ्या माघारी ते हळूच तंबाखू खायचे, असंही अजित पवारांनी यावेळी सांगितले.

2014 मध्ये विधानसभा निवडणुकांचे निकाल लागतात न लागतात तोच साहेबांनी भाजपला पाठिंबा जाहीर केला होता. विचारधारा सोडून भाजपला बिनशर्थ पाठिंबा कसा काय द्यायचा असं विचारलं तर, ” सरकार बदललं आहे, मदत केली पाहिजे, 1999मध्येही असंच झालं सोनिया गांधी यांना विरोध करायचा म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाली. पण विधानसभा निवडणुका होताच, त्यांनी काँग्रेसला पाठिंबा दिला. तेव्हाही, सरकारमध्ये गेल्याशिवाय कामे होत नाहीत, असं म्हणाले, मग मी गेलो तर काय झालं, माझं काय चुकलं, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

हेही वाचा :

निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस

कोल्हापूरच्या शिरोळ तालुक्यात महाविकास आघाडीत बंडखोरी

क्रिकेटवरून एमएस धोनी आणि पत्नीमध्ये जुंपले भांडण; थर्ड अंपायरच्या निर्णयाने निवाडा