निवडणुकीत मतदारांची नावे वगळल्याचा काँग्रेसचा आरोप; निवडणूक आयोगाने दिले उत्तर
मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुका आणि निकालावरून गेल्या काही दिवसांपासून काँग्रेससह(Congress) राज्यभरातील विरोधी पक्षांकडून प्रश्न उपस्थित केले जात आहेत. इतकेच नव्हे तर, केंद्रीय निवडणूक आयोगालाही लक्ष्य केलं जात आहे. अशातच, या सर्व प्रकरणात आता केंद्रीय निवडणूक आयोगानेही काँग्रेसला उत्तर दिले आहे. महाराष्ट्राच्या प्रत्येक विधानसभा जागेसाठी पक्षाने मागवलेला डेटा आणि फॉर्म 20 महाराष्ट्र निवडणूक आयोगाच्या वेबसाइटवर उपलब्ध आहे, तो डाउनलोड करून पाहू शकता, असंं आयोगाने म्हटलं आहे.
महाराष्ट्र निवडणुकीच्या मतदार यादीबाबत उपस्थित करण्यात आलेल्या प्रश्नांना केंद्रीय निवडणूक आयोगाने सविस्तर उत्तरे दिली. निवडणूक आयोगाने म्हटले आहे की, काँग्रेसने(Congress) दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, महाराष्ट्रात झालेल्या लोकसभा-विधानसभा निवडणुकीत 80 हजार 391 मतदारांची नावे मतदार यादीतून वगळण्यात आली होती. म्हणजे एका विधानसभेतून सरासरी 2779 मतदार काढून टाकण्यात आले.
यावर निवडणूक आयोगाने म्हटले आहे की, जी नावे हटवण्यात आली आहेत त्यांच्यासाठी संपूर्ण प्रक्रियेचे पालन करण्यात आले आहे. नोटीस जारी करण्याबरोबरच, अशा प्रकरणांमध्ये मतदाराचा मृत्यू झाला आहे, किंवा त्याचा पत्ता बदलला आहे, किंवा तो आता त्या पत्त्यावर राहत नाही, याची खात्री करण्यासाठी क्षेत्र सर्वेक्षण करण्यात आले, त्यानंतरच मतदारांची नावे मतदार यादीतून काढून टाकण्यात आली.
काँग्रेसला दिलेल्या उत्तरात निवडणूक आयोगाने संपूर्ण निवडणूक प्रक्रियेदरम्यान राजकीय पक्ष किंवा उमेदवारांच्या सक्रिय सहभागाची सुमारे 60 उदाहरणे दिली. निवडणूक आयोगाने म्हटले आहे की, राजकीय पक्ष/उमेदवारांचा अर्थपूर्ण सहभाग हा भारतीय निवडणूक प्रक्रियेचा प्रमुख आधारस्तंभ आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसंदर्भातील तक्रारींबाबत काँग्रेस नेत्यांच्या शिष्टमंडळाने नुकतीच निवडणूक आयोगाची भेट घेतली होती. काँग्रेसचे खासदार आणि ज्येष्ठ वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी निवडणूक आयोगाकडे अनेक आकडे मागितल्याचे सांगितले होते.
दरम्यान, महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीनंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी निवडणूक आयोगावर मतदार यादीतून नावे वगळल्याचा आरोप केला होता. निवडणुकीनंतर पत्रकार परिषद घेत त्यांनी आयोगावर निशाणा साधला होता.नाना पटोले यांनी बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यातील तेल्हारा गावातील सरपंचाचा व्हिडीओ दाखवत या गावातील मतदारयादीतील 60 नावे वगळण्यासाठी सत्ताधारी भाजपकडून दबाव टाकला जात असल्याचा आरोपही त्यांनी केला होता.
नाना पटोले यांनी दाखवलेल्या व्हिडीओत तेल्हारा गावाच्या सरपंच किरण गाडेकर यांचा एक व्हिडिओ दाखवत गावातील मतदार याद्यांमधून मतदारांची नावेच वगळण्यात येत असल्याचा गंभीर केला. या किरण गाडेकर यांनी त्यांच्यासह गावातील ६० मतदारांचे नाव यादीतून वगळण्याचा प्रयत्न होत असल्याचा दावा केला. भाजप आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून दाबवतंत्राचा वापर केला जता आहे. फॉर्म 7 मार्फत आमचे मतदार कमी करण्याचा प्रयत्न आहे. याबाबत आम्ही निवडणूक आयोगाकडे आजच तक्रार करणार, असल्याचेही नाना पटोले यांनी यावेळी स्पष्ट केले.
हेही वाचा :
सत्य काही वेगळचं, मोहम्मद शामी आणि सानिया मिर्झाचा फोटो झाला व्हायरल
MPSC विद्यार्थ्यांसाठी मोठी खुशखबर; संयुक्त परीक्षेबाबत महाराष्ट्र सरकारने घेतला ‘हा’ मोठा निर्णय
मंत्रिमंडळविस्तार, खातेवाटपानंतर आता ‘या’ मुद्द्यावरून शिंदे गटाच्या नेत्यामंध्ये नाराजी