महाविकास आघाडीत ‘महाबिघाड’? काँग्रेसचा मुख्यमंत्री दावा उद्धव ठाकरे करणार का मान्य

एकीकडे विधानसभा निवडणूकीची तयारी सुरु असताना उद्धव ठाकरे मात्र, काहीसे अस्वस्थ आहेत. काँग्रेसने(Congress) केलेल्या अंतर्गत सर्वेमुळे ठाकरेंचं टेन्शन वाढलेलं दिसतंय. त्यामुळे त्यांची अवस्था केविलवाणी झाली आहे. हा सर्वे खरा ठरल्यास उद्धव ठाकरेंपुढे कोणता पर्याय उरणार? हाही मोठा प्रश्न आहे.

खरंतर प्रदेश काँग्रेसने(Congress) एक खाजगी सर्वे केला आहे. या सर्वेनुसार काँग्रेसला ८५ हून अधिक जागा मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर शरद पवार गटाला ५५ ते ६० आणि उबाठा गटाला केवळ २५ ते ३० जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय. त्यामुळे उद्धव ठाकरे अस्वस्थ असल्याचं दिसून येतंय.

मुख्यमंत्रीपदासाठी चाललेली उद्धव ठाकरेंची धडपड या सर्वेमुळे पार धुळीस मिळाल्याचं दिसतंय. थेट दिल्ली गाठून त्यांनी मुख्यमंत्रीपदाचा चेहरा ठरवण्याची मागणी केली. एवढंच नाही तर महाविकास आघाडीतील मित्रपक्षांनाही मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर करण्याची मागणी केली. परंतू, काँग्रेस आणि शरद पवार गटाने त्यांची ही मागणी परस्पर फेटाळून लावली आणि ज्याच्या जास्त जागा त्या पक्षाचा मुख्यमंत्री, असं त्यांना सांगण्यात आलं.

या सगळ्यानंतर आता काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसचाच मुख्यमंत्री होणार आहे, असं विधान केलं. एका मेळाव्यात बोलताना त्यांनी “मला १०० टक्के खात्री आहे की, महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसचाच मुख्यमंत्री होणार. त्यासाठी आपण सर्वांनी चांगलं काम करा,” असं आवाहन कार्यकर्त्यांना केलं.

त्यामुळे आता उद्धव ठाकरेंचं टेन्शन वाढल्याचं दिसतंय. एकीकडे ज्याच्या जास्त जागा त्या पक्षाचा मुख्यमंत्री असं ठाकरेंना सांगण्यात आलं. तर दुसरीकडे, काँग्रेसच्या अंतर्गत सर्वेमध्ये मात्र, उबाठा गटाला सर्वात कमी जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय. शिवाय बाळासाहेब थोरातांनी केलेलं वक्तव्यही ताजं आहेच. या सगळ्यामुळे उद्धव ठाकरेंची अवस्था केवीलवाणी झाली आहे.

हेही वाचा:

सर्वात मोठी बातमी! सुप्रीम कोर्टाचं अधिकृत यूट्यूब चॅनल हॅक

खासगी आयुष्याबदल तृप्ती डिमरीचा सर्वात मोठा खुलासा, म्हणाली ‘कोणत्या धंद्यात…’

लाडकी बहीण योजनेचा अर्ज दाखल करण्याची शेवटी तारीख जाहीर