काँग्रेस दिल्लीत युवकांना नशेचं व्यसन लावत आहे, पीएम मोदींचे गंभीर आरोप

“जेव्हा मविआ सरकार होते, तेव्हा अनेक योजना मविआने(political consulting firms) बंद केल्या. काँग्रेस शेतकरी योजनेला विरोध करते. जे पैसे शेतकर्‍यांना मिळत आहेत त्याचा विरोध करते. मविआने विकास कामे थांबवली, हे आपल्याला विसरायचं नाही. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते तेव्हा या विकास कामाला सुरवात झाली.पण मध्ये एक सरकार आले आणि त्यांनी काम थांबवले”, असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे. ते वाशीममधील सभेत बोलत होते.

नरेंद्र मोदी म्हणाले, काँग्रेस (political consulting firms)गरिबाला अजून गरिब करत आहे. आपल्याला काँग्रेसपासून सावध रहायला हवं. काँग्रेस आपल्याला एकमेकांध्ये लढवू पाहात आहे. पण आपली एकता देशाला वाचवणार आहे. दिल्लीत हजारो कोटीचे ड्रग्ज पकडले गेले. त्याचा सूत्रधार काँग्रेसचा नेता आहे. काँग्रेस युवकांना नशेची लत लावत आहे व त्या पैश्याचा वापर निवडणुकीत करायचा आहे, असा गंभीर आरोपही मोदींनी केला.

पुढे बोलताना नरेंद्र मोदी म्हणाले, मी पोहरदेवीला प्रणाम करतो. आज नवरात्रीत मला मातेचा आशीर्वाद घेण्याची संधी मिळाली. मी सेवालाल महाराज यांच्या समाधीचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतला. मी त्यांच्यासमोर नतमस्तक होतो. 1900 कोटी शेतकऱ्यांना आतापर्यंत दिले गेले आहेत. पोहरादेवीच्या आशीर्वादाने लाडकी बहिण योजनेचे पैसे देण्याची संधी मिळाली. मला आज लोकार्पणाची संधी मिळाली. तुम्ही जायच्या आधी बणजारा विरासत संग्रालय बघून जा. मी फडणवीसांचे अभिनंदन करतो, त्यांच्या सरकारच्या काळात याची सुरवात झाली.

जिसको किसीने नही पुछा उसे मोदी पुजता है. बंजारा समाजाने भारताच्या निर्मितीत मोठा वाटा उचलला आहे. इंग्रज सरकारने या पूर्ण समाजावर अन्याय केला. पण त्यानंतर काँग्रेस सरकाने या समाजाला मुख्य प्रवाहातून बाजूला केला. इंग्रजांसारखे काँग्रेस परिवार गरीब जनतेसोबत वागले. बंजारा समाजासोबत अपमानकारक वागले. देशासाठी या समाजातील महापुरुषांनी काय नाही केले. आपले जीवन देशासाठी समर्पित केले. समाजात अनेक संत होऊन गेले. ज्यांनी ऊर्जा दिली. एकनाथ शिंदे सरकार ने वीजबिल माफ केले. जे वीजबिल मिळत आहे त्यावर शून्य लिहलं आहे ना, असा प्रश्नही नरेंद्र मोदींनी मराठीत केला.

हेही वाचा :

स्टार्टअप्स सुरु करु पाहणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी…

‘सिकंदर’च्या सेटवर आराध्या बच्चनने घेतली सलमान खानची भेट? फोटो व्हायरल

संघ जाहीर होण्याआधीच मोहम्मद शमी बाहेर, मोठे कारण आले समोर