कॉँग्रेस नेते राहुल गांधींच्या अडचणी वाढणार? थेट गुन्हा दाखल

वाराणसी: विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे काही दिवसांपूर्वी अमेरिका दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी एका मुलाखतीमध्ये शीख समुदायाबद्दल एक वक्तव्य केले होते. त्या वक्तव्यामुळे शीख समाजामध्ये संताप निर्माण झाला आहे. दरम्यान यावरून आता राजकारण तापले आहे. काँग्रेसने(Congress) याचा व्हिडीओ शेअर केला आहे. भाजपकडून राहुल गांधींच्या वक्तव्याचा निषेध केला जात आहे. तसेच आता या वक्तव्यावरून राहुल गांधी यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. कारण राहुल गांधी यांच्याविरोधात वाराणसी येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अमेरिकेतील एका कार्यक्रमात राहुल गांधी यांच्या शीख समाजावरील विधानामुळे हा वाद निर्माण झाला आहे. एखाद्या शीख व्यक्तीने भारतात पगडी किंवा हातात कडे घालावे की नाही, एखादी शीख व्यक्ती गुरुद्वारामध्ये जाऊ शकते की नाही. यासाठी ही लढाई असून, केवळ याच नाही तर सर्व धर्मांसाठी आहे, असे विधान राहुल गांधी यांनी केले होते. यावर भाजप व शीख समाजाने आक्षेप घेतला आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाराणसी लोकसभा मतदार संघात राहुल गांधीविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आले आहे.

शीख समुदायाच्या धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी काँग्रेस(Congress) नेते आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्याविरोधात कलम १५२ अन्वये वाराणसीमधील सिग्रा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यासंदर्भात राहुल गांधींची वादग्रस्त वक्तव्ये देशाच्या एकात्मतेला आणि अखंडतेला धोका असल्याचा आरोप भाजपने केला आहे.

या संदर्भात भाजपचे जिल्हाध्यक्ष एमएलसी हंसराज विश्वकर्मा आणि महानगर अध्यक्ष विद्यासागर राय यांच्या नेतृत्वाखाली पक्षाचे कार्यकर्ते गेल्या शुक्रवारी सिग्रापोलिस ठाण्यात पोहोचले. दरम्यान, भाजपचे महानगर उपाध्यक्ष अशोक कुमार, रहिवासी रंगिया महल, आंध्रपुल यांनी सिग्रा पोलिस स्टेशन प्रभारी यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे.

दिल्लीचे माजी आमदार आणि भाजप नेते तरविंदर सिंग मारवाह यांनी सोनिया गांधी यांच्या निवासस्थानासमोरील निदर्शनामध्ये एक वक्तव्य केले. त्यात ते म्हणाले, ”राहुल गांधी वेळीच सावध व्हा. नाहीतर येणाऱ्या काळात तुमची देखील तुमच्या आजीसारखीच गत होईल.” अशा इशारा तरविंदर सिंग मारवाह यांनी दिला. हा व्हिडीओ काँग्रेसने सोशल मीडियावर शेअर केला आहे .

तसेच काँग्रेसने मोदींना टॅग करून कारवाईची मागणी केली आहे. तसेच हे प्रकरण अतिशय गंभीर आहे. तुमच्या पक्षाच्या द्वेषाच्या फॅक्टरीचं हे प्रॉडक्ट आहे, असे काँग्रेसने म्हटले आहे. यावर कारवाई करावीच लागेल, अशी मागणी काँग्रेसने केली आहे.

हेही वाचा:

कापूस, सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी खूषखबर!

विराट कोहलीने बांगलादेशला डिवचलं; नागीन डान्स करत मैदान गाजवलं

बिग बॉस मराठी 5 बंद होणार? ‘या’ तारखेला होणार ग्रँड फिनाले