मराठा आरक्षणावरून पुन्हा वादंग, पृथ्वीराज चव्हाणांची जरांगे यांच्याशी भेटी नंतर सरकारवर टीका
महाराष्ट्रातील मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर राजकीय (political)वातावरण पुन्हा तापले आहे. 23 ऑगस्ट रोजी माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची जालना येथे भेट घेतली. या भेटीनंतर चव्हाण यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारवर गंभीर आरोप केले.
चव्हाण यांनी आपल्या आरोपात म्हटले की, “आमचं सरकार असताना मराठा समाजाला आरक्षण देण्यात आलं होतं, परंतु फडणवीस यांच्या सरकारला ते आरक्षण टिकवता आलं नाही. मराठा समाजाचे आरक्षण मिळवण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न केले, मात्र भाजप सरकारने त्याला न्याय दिला नाही.”
चव्हाण आणि जरांगे यांच्या या भेटीमुळे राजकीय वर्तुळात मोठ्या चर्चांना उधाण आलं आहे. जरांगे पाटील यांनी पूर्वीच सत्ताधारी महायुतीविरोधात उघड भूमिका घेतली होती, ज्यामुळे अनेक मतदारसंघांमध्ये महायुतीच्या उमेदवारांचा पराभव झाला होता. यामुळे, या भेटीला अधिक महत्त्व प्राप्त झालं आहे.
जरांगे यांनी स्वतंत्रपणे उमेदवार उभे करण्याची घोषणा केल्याने आगामी निवडणुकांमध्ये महायुतीसोबत महाविकास आघाडीच्याही गोटात अस्वस्थता निर्माण झाली आहे. चव्हाण यांनी राज्य सरकारला उद्देशून म्हटलं की, “चर्चा नका करू, मागणी मान्य करा.”
या घटनाक्रमामुळे मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर राज्यातील राजकीय संघर्ष अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे.
हेही वाचा :
औषधांच्या गोळ्या कडू का लागतात? कारण जाणून तुम्हालाही होईल आश्चर्य!
महिनाभर नाश्ता वगळल्यास होऊ शकतात गंभीर आरोग्य परिणाम
केएल राहुल ची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून Retirement?: इंस्टाग्राम स्टोरीने क्रिकेट विश्वात उडवली खळबळ