खिडकीचा पडदा न लावताच जोडप्याचा S*x; हॉटेलमोरच्या ब्रीजवर बघ्यांच्या गर्दीमुळे वाहतूक ठप्प : Video

प्रेमात असताना भान राहत नाही असं म्हणतात. असाच काहीसा प्रकार राजस्थानमधील जयपूरमध्ये समोर आला आहे. जयपूरमधील सिव्हिल लाईन्स परिसरातील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये(Hotelmore ) एका जोडप्याच्या खाजगी क्षणांचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या प्रकारामुळे एकच खळबळ उडाली असून पंचतारांकित हॉटेल्सच्या सुरक्षेसंदर्भात प्रश्नचिन्हं उपस्थित केली जात आहेत.

मंगळवारी रात्री साडेदहाच्या सुमारास ‘भारत जोडो सेतू’ पुलावरून जाणाऱ्या चालकांचं लक्ष हॉटेलमधील(Hotelmore ) एका खिडकीत दिसत असलेल्या दृष्याने वेधून घेतलं. हे जोडपे हॉटेलच्या त्यांच्या खोलीत एकांतात क्षण घालवत होते. मात्र हॉटेलच्या रुमच्या खिडकीवर पडदा नसल्याने रस्त्यावरून या दोघांमधील प्रणयक्रीडेचं संपूर्ण दृश्य समोरच्या ब्रीजवरुन स्पष्ट दिसत होते. या हॉटेलसमोरुन जाणाऱ्या पूलावरील वाहनचालकांच्या ही गोष्ट लक्षात आली तेव्हा अनेक गाड्या या पुलावर थांबून हे दृष्य पाहत होत्या. पाहता पाहाता या हॉटेलच्या समोरील पुलावर बघ्यांची गर्दी झाली. या साऱ्या प्रकाराचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

पुलावर गर्दी करुन समोरच्या हॉटेलमध्ये सुरु असलेला जोडप्याचा रोमॅन्स पाहणाऱ्यांच्या गर्दीतील एका ड्रायव्हरने आपल्या मोबाईलमध्ये हा व्हिडिओ बनवला आणि तो सोशल मीडियावर व्हायरल केला. हॉटेलमधील हे नको ते दृष्य पाहण्यासाठी पुलावर एवढी गर्दी झाली ती पुलावर वाहतूक कोंडीसारखी परिस्थिती निर्माण झालेली. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर अनेक लोक गमतीने या प्रकाराला, “ओपन सिनेमा हॉल” म्हणत असल्याचं दिसून येत आहे.

 

व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर, जेव्हा माध्यमांनी व्हिडीओत दिसणाऱ्या ‘हॉलिडे इन’ या हॉटेल व्यवस्थापनाशी संपर्क साधला तेव्हा त्यांनी अशा कोणत्याही व्हिडिओची माहिती नसल्याचे स्पष्ट केले. व्हिडिओमध्ये दिसणारी रुमही आपल्या हॉटेलचा(Hotelmore ) भाग असल्यासं स्वीकारण्यासही हॉटेलने नकार दिला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर अनेकांनी शेअर केला आहे.

तंत्रज्ञान आणि सोशल मीडियाच्या या युगात गोपनीयतेचे उल्लंघन वाटेल त्या पद्धतीने होऊ शकतं हेच या प्रकरणावरुन अधोरेखित झालं आहे. या जोडप्याची खिल्ली उडवली जात असली तरी या प्रकरणावरुन कोणी कुठूनही तुमच्यावर लक्ष ठेऊन असू शकतं याचं भान राखलं पाहिजे असं अनेकांनी सोशल मीडियावर व्यक्त होताना या व्हिडीओचा संदर्भ देत म्हटलं आहे.

हेही वाचा :