भूत-प्रेतांचा दरबार! कुणी किंचाळतं तर कुणी मुंडक्या फिरवतं; Viral Video पाहून फुटेल घाम

सोशल मीडियावर नेहमीच अनेक वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओज (video)व्हायरल होत असतात. यातील बरेच व्हिडिओ हे आपल्या कल्पनेपलीकडचे निघतात. व्हिडिओतील हे दृश्ये कधीकधी इतके थरारक आणि भयावह वळण घेते की ते पाहताच आपल्या पायाखालची जमीन हादरते.

आताही काही असाच प्रकार सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे मात्र यातील दृश्ये काहीशी वेगळी आहेत. भूतप्रेत अथवा भुताटकीचे प्रकार पाहायला तुम्हाला आवडत असेल तर हा व्हिडिओ तुमच्या आवडीचा ठरेल. भूत अंगात आल्यावर काय घडतं याचे एक भयावह दृश्य सध्याच्या व्हायरल व्हिडिओमध्ये शेअर करण्यात आले आहे. चला याविषयी सविस्तर जाणून घेऊया.

व्हायरल व्हिडिओ हा महाराष्ट्रातील नाशिक जिह्यातील आहे. व्हिडिओत नाशिकमधील एक देवस्थान दाखवण्यात आले आहे जे भूतप्रेत काढून टाकण्यास एक लोकप्रिय आणि श्रद्धेचे ठिकाण मानले जाते. भाविक इथे आपल्या समस्या अथवा पछाडलेल्या भूतांपासून मुक्ती मिळवण्यासाठी या ठिकाणाला भेट देतात. व्हिडिओत तुम्ही पाहू शकता, यात लोकांचा एक दरबार भरल्याचे दिसून येते. लोकांची गर्दी आणि त्यांच्यामध्ये नाचणारी काही लोक व्हिडिओत दिसून येतात.

वास्तविक त्यांना भुतांनी पछाडल्याचे व्हिडिओत सांगण्यात आले आहे. काही नाचत आहेत तर काही गेट जोरजोरात आपटत आहेत काही लोळत आपले शरीर हलवत आहेत तर काही छतावर चढल्याचेही दिसून आले आहे. हे सर्वच दृश्य आजूबाजूची लोक खुल्या डोळ्यांनी पाहत असल्याचे दिसून येते, यावेळी लोकांमध्ये एकदम शांतता आणि भीतीचे वातावरण असते. व्हिडिओतील या दृश्यांनी फक्त आजूबाजूच्या लोकांनाच काय तर सोशल मीडिया युजर्सनाही घाबरवून सोडले.

हा श्री दत्त देवस्थान धारणगाव खडक, निफाड, नाशिक येथील असल्याचा व्हिडिओत सांगण्यात आले आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो युजर्सच्या व्युज मिळाल्या असून @shri_datta_devsthan_dharangaon नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून हा व्हिडिओ(video) शेअर करण्यात आला आहे. या अकाऊंटवर तुम्हाला भूतकीचे असे अनेक व्हिडिओज पाहायला मिळतील मात्र व्हिडिओतील हे दृश्य कितपत खरे आहेत याची काही शाश्वती देता येत नाही.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

हेही वाचा :