असा क्रिकेट प्रेमी होणे नाही! तरुण स्वतःच्याच लग्नात फोनवर बघू लागला IPL मॅच…Video Viral

सोशल मीडियावर नेहमीच काही ना काही शेअर होत असत. लोक हे व्हिडिओ(video) फार आवडीने पाहतात आणि नंतर शेअर देखील करतात. इथे तुम्हाला अनेक अजब-गजब आणि थक्क करणाऱ्या गोष्टी दिसतील, ज्यांची तुम्ही कधी कल्पनाही केली नसेल.

आताही इथे असाच एक व्हिडिओ(video) व्हायरल झाला आहे ज्यात एक क्रिकेट प्रेमी चक्क स्वतःच्याच चालू लग्नात फोनवर मॅच पाहताना आढळून आला. त्याचे हे क्रिकेट वेड पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आणि लोक हा व्हिडिओ वेगाने शेअर करू लागले. नक्की काय घडले ते चला सविस्तर जाणून घेऊया.

सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये वर लग्नासाठी काही विधी करण्यासाठी बसलेला दिसत आहे. त्याच्या समोर सर्व पूजेचे सामान दिसत आहे, पण समोर पाहण्याऐवजी त्याची नजर खाली ठेवलेल्या त्याच्या फोनवर आहे. व्हिडिओ बनवणाऱ्या व्यक्तीने झूम इन केले तेव्हा वराचे संपूर्ण लक्ष आयपीएल सामन्यावर असल्याचे उघड झाले. म्हणजेच त्याच्या लग्नाच्या दिवशी आणि लग्नादरम्यानही त्याचे लक्ष क्रिकेटवरून हटत नाही जे पाहून सर्व दंग झाले अमी तरुणाला खरा क्रिकेट लव्हर म्हणू लागले.

हा व्हायरल व्हिडिओ @desikhabari नावाने शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला, ‘लग्न होईल पण आयपीएल चुकता कामा नये” असे कॅप्शन देण्यात आले आहे. व्हिडिओ वेगाने व्हायरल होत असून लोक आता मिश्किल कमेंट्स करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत. एका युजरने लिहिले आहे, “क्रिकेट फॅन्स कोणत्याही ठिकाणी मॅच पाहू शकतात” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “लग्न जाऊदे, आपल्या आवडत्या टीमची मॅच चुकायला नको”.

हेही वाचा :

धक्कादायक! गौतम गंभीरला जीवे मारण्याची धमकी

उष्णता वाढणार, घामाच्या धारा निघणार; काळजी घ्या, ‘या’ जिल्ह्यांना उष्णतेचा यलो अलर्ट

उन्हाळ्यात लहान मुलांसाठी घरी बनवा थंडगार गुलाब कुल्फी