कोलकाता बलात्कार अन् हत्या प्रकरणात आरोपीला कोर्टाने सुनावली जन्मठेपेची शिक्षा

कोलकाता येथील आर. जी. कर रुग्णालयातील डॉक्टर तरुणीवर बलात्कार आणि त्यानंतर झालेल्या हत्या प्रकरणाने संपूर्ण देश हादरला होता. या प्रकरणी आरोपी संजय रॉयला अखेर न्यायालयाने(Court) जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. न्यायालयाने हा निर्णय २.४५ पर्यंत राखून ठेवला होता. सीबीआयने या प्रकरणात आरोपी संजय रॉयला फाशी द्यावी अशी मागणी केली होती.

संजय रॉयच्या अटकेनंतर सुमारे सहा महिन्यांनी विशेष न्यायालयाने(Court) संजय रॉयला बलात्कार आणि हत्येप्रकरणी दोषी ठरवलं होत. गुन्ह्याच्या तीव्रतेमुळे जन्मठेपेची किंवा फाशीची शिक्षा होण्याची शक्यता न्यायाधीशांनी व्यक्त केली होती. मात्र, पीडिता प्रशिक्षणार्थी असलेल्या आर. जी. कर रुग्णालयातील कनिष्ठ डॉक्टरांनी या निर्णयावर नाराजी व्यक्त केली. त्यांनी न सुटलेले प्रश्न आणि इतर संभाव्य संशयितांवर कारवाई न झाल्याचा सांगत या प्रकरणाचा सखोल तपास कऱण्याची मागणी केली होती.

आज झालेल्या सुनावणीत सीबीआयने आर. जी. कर महाविद्यालय आणि रुग्णालयात घडलेली घटना धक्कादायक आणि देशाला हादरवणारी होती असं म्हटलं आहे. तर हा गुन्हा दुर्मिळातला दुर्मीळ आहे असं निरीक्षण न्यायालयाने नोंदवलं आहे. दरम्यान, पोलिसांच्या चौकशीत संजय रॉयने गुन्हा मान्य केला आहे. ट्रेनी डॉक्टर सेमिनार हॉलमध्ये झोपली होती तेव्हा तिच्यावर बलात्कार केल्याचं संजय रॉयने मान्य केलं. संजय रॉय हा त्या दिवशी रात्री दोन ते तीनवेळा हॉस्पिटलमध्ये आला होता.

कोलकाता येथील आर. जी कर मेडिकल महाविद्यालय आणि रुग्णालयात एका डॉक्टरची अत्यंत क्रूर पद्धतीने हत्या करण्यात आली. त्याआधी तिच्यावर बलात्कार करण्यात आला. तिच्या मृतदेहावर अनेक जखमा होत्या. ९ ऑगस्ट २०२४ ला ही घटना घडली होती. या घटनेचा देशभरातून निषेध करण्यात आला. या घटनेवरुन देशभरातले डॉक्टर हे त्यांच्या सुरक्षेच्या मुद्द्यावर आक्रमक झाल्याचं शनिवारी पाहण्यास मिळालं.

या घटनेतले नवे पैलू रोज समोर येत होते. तसंच आर. जी. कर महाविद्यालय आणि रुग्णालयातील ट्रेनी विद्यार्थ्यांनी सुमारे दीड महिना आंदोलन केलं होतं. कोलकाता बलात्कार प्रकरणातला मुख्य आरोपी संजय रॉय हा रुग्णालयातील डॉक्टरवर बलात्कार करण्याआधी आणि तिची हत्या करण्याआधी तो रेड लाइट एरियात गेला होता अशी माहिती समोर आली होती. हे प्रकरण सीबीआयकडे वर्ग करण्यात आलं होतं. सेलदाह कोर्टात या प्रकरणाची सुनावणी झाली.

हेही वाचा :

ॲनाकोंडासोबत आंघोळ करू लागली तरुणी ; घटनेचा थरारक Video Viral

’23 जुलैला मोठा राजकीय स्फोट…’; शिवसेना नेत्याचं वक्तव्य चर्चेत

ऋषभ पंत बनला लखनऊ सुपर जायंट्सचा नवा कर्णधार!