जगातील सात आश्चर्यांपैकी एक असलेल्या ताजमहालच्या भिंतींना, घुमटाला तडे
जगातील सात आश्चर्यांपैकी एक असलेला ताज महालबाबत(Taj Mahal) एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. ताज महाल भारताच्या स्थापत्यशैलीचा सर्वोत्कृष्ट नमुना आहे. मात्र, याच ताजमहालच्या भिंतींना भेगा पडण्यास सुरूवात झाली आहे. तर, घुमटावर काही ठिकाणी रोपं उगवण्यास सुरुवात झाली आहे. ताजमहालची अशी अवस्था नेमकी कशामुळं झालीये, याची चर्चा सध्या सुरू आहे.
ताजमहालच्या(Taj Mahal) देखभालीसाठी जवळपास दरवर्षी 3 ते 4 कोटींचा खर्च केला दातो. मात्र, तरीही दिवसेंदिवस ताजमहालची चमक फिकी पडत आहे. टुरिस्ट फेडरेशन ऑफ इंडियाचे राष्ट्रीव महासचिव शकील चौहान यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्य घुमटाजवळाच्या चारही दरवाजाजवळ अरबी भाषेत लिहलेल्या कुराणमधील आयतेंवरील मजकूर फिका पडण्यास सुरुवात झाली आहे. शादी मशिदीसमोरील मोझॅक स्टोन नक्षीकामापासून ते फरशीवरही काहीसे नुकसान झाले आहे. मुख्य थडग्याजवळ आणि घुमुटाच्या भिंतींवरही भेगा पडल्याचे दिसत आहेत.
भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाने दिलेल्या माहितीनुसार, ताजमहालचा ढाचा सुरक्षित आहे. त्याला कोणत्याही प्रकारचा धोका नाहीये. देखभालीसाठी येणाऱ्या निधीचे ऑडिटदेखील केले जाते. टुरिस्ट गाइड वेलफेअर असोसएशनचे अध्यक्ष दीपक दान यांनी या दाव्यावर सवाल उपस्थित केले आहेत. ASI कोणत्या आधारावर हे सांगू शकता की ताजमहाल सुरक्षित आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, ताजमहालच्या बांधकामात वापरण्यात आलेल्या दगडांचे सांधे मजबूत करण्यासाठी काही लोखंडी रॉड वापरण्यात आले होते. हेच रॉड आता अडचणीचे कारण ठरत आहेत. ओलावा आणि ऑक्सिजनच्या संपर्कात आल्याने त्यांना गंज लागला असून ते फुगले आहेत. त्यामुळं भिंतींना तडे गेले आहेत. यामुळंच आता संवर्धनाच्या कामात लोखंडाऐवजी स्टीलचे क्लॅम्प आणि रॉड वापरण्यात आले आहेत.
मुघल काळात स्मारकाच्या बांधकामासाठी चुना आणि विशेष मसाल्यांबरोबर लाखौरी विटा, रेड सँड स्टोनचा वापर करण्यात आला होता. शहजहांच्या काळात पांढऱ्या संगमरवरचा वापर करण्यात आला होता. त्या काळात लोह हे खूप मजबूत मानलं जायचं. दगडांना जोडण्यासाठी वापरण्यात येणारे क्लँप लोखंडापासून बनवण्यात आले आहेत. त्याचबरोबर, घुमटाच्या आतदेखील लोखंडाचा वापर करण्यात आला आहे.
2016 मध्ये ताजमहालच्या उत्तर-पश्चिम मिनारचा कलश तुटण्याचे मुख्य कारण म्हणजे लोखंडी रॉड वितळला होता. ताजमहालमध्ये असलेली मुमताजची कबर आणि मिनारच्या बाहेरील भिंतीनाही लोखंडी कठडे गंजल्यामुळं तडे गेले आहेत. पावसाळ्यात तर लोखंडाच्या रॉडला गंज लागल्याने शक्यता विभागाकडून व्यक्त केली जात आहे.
हेही वाचा:
मी राजीनामा का दिला…; अरविंद केजरीवाल स्पष्टच बोलले
भररस्त्यात तरूणाने रूसलेल्या गर्लफ्रेंडला मनवण्यासाठी केले असं काही…Video
दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीलाही तृप्ती डिमरीची भुरळ? धनुषसोबत करणार रोमान्स