क्रिकेटर मोहम्मद सिराज करणार लग्न? अभिनेत्रीच्या आईने केले स्पष्ट

टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज(Cricketer) रिलेशनशिपमध्ये आहे. तो बिग बॉसची फायनलिस्ट आणि अभिनेत्री माहिरा शर्माच्या प्रेमात आहे अशी चर्चा आहे. 29 वर्षीय सिराज 2017 पासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळत आहे. पण, त्याला 2020 सालापासून ओळख मिळाली, जेव्हा अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली त्याने ऑस्ट्रेलियाला घरच्या मैदानावर कसोटी मालिकेत पराभूत करण्यात आपली भूमिका बजावली. तो सध्या प्रेमाच्या खेळपट्टीवर काम करत आहे.

टेलिव्हिजन अभिनेत्री आणि बिग बॉस 13 फेम माहिरा शर्मा भारतीय क्रिकेटर(Cricketer) मोहम्मद सिराजला डेट करत असल्याची तुफान चर्चा आहे. तथापि, तिच्या आईने या अफवांचे खंडन केले आहे की तिची मुलगी एक सेलिब्रिटी असल्याने लोक तिला कोणाशीही जोडतात असे ती म्हणाली आहे. ईटाइम्सच्या रिपोर्टनुसार, माहिरा आणि सिराज ‘रोमँटिकली लिंक’ आहेत. दोघांच्या जवळच्या स्त्रोताने सांगितले की दोघे एकमेकांना ओळखत आहेत आणि सोशल मीडियावर एकमेकांना फॉलो करत आहेत.
मात्र, त्यांची मुलगी सिराजला डेट करत असल्याच्या बातम्या इंटरनेटवर पसरल्यानंतर सानिया शर्माने सांगितले की, “काय? तुम्ही काय म्हणताय? असं काही नाही. लोक काहीही बोलतात. आता माझी मुलगी सेलिब्रिटी आहे. लोक तिचे नाव कोणाशी जोडतील, तर ते तसेच आहे असे मानायचे का?”

गेल्या अनेक दिवसांपासून सोशल मीडिया जगतात सिराज आणि माहिरा यांच्या रिलेशनविषयीच्या चर्चा रंगत आहेत. विशेषत: जेव्हा सिराजने माहिरासोबत सोशल मीडियावर बोलण्यास सुरुवात केली तेव्हा ही अफवा जोर धरू लागली. त्या दोघांची ओळख नोव्हेंबर 2024 मध्ये झाली, तेव्हाच चाहत्यांनी सोशल मीडियावर पहिल्यांदाच या नात्याबद्दल अंदाज बांधायला सुरुवात केली. त्यानंतर सिराजने माहिराची इन्स्टाग्राम पोस्ट लाईक केली होती आणि त्यानंतर दोघेही या प्लॅटफॉर्मवर एकमेकांना फॉलो करू लागले होते.
काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध गायिका आशा भोसले यांची नात जनाई भोसले 29 वर्षीय क्रिकेटर सिराजला डेट करत असल्याची चर्चा होती. अफवा व्हायरल झाल्यानंतर, जनाई आणि सिराज यांनी त्यांच्या नात्याबद्दल गोष्टी क्लिअर करत आणि एकमेकांचे भाऊ-बहीण असल्याचे सांगितले.
हेही वाचा :
राज्यावर एकाएकी पावसाचं सावट; विचित्र हवामानापुढं सगळ्यांनीच मानली हार
पूनम पांडेने महाकुंभात केले स्नान; म्हणाली- ‘माझे सर्व पाप धुतले गेले’!
Video : अमेरिकेत भीषण अपघात! हेलिकॉप्टर धडकेत विमान नदीत कोसळलं; 19 जणांचा मृत्यू